Manasvi Choudhary
आजकाल तरूण वयातच अनेकांना हाडे ठिसूळ होण्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. चुकीच्या आहारपद्धतीमुळे हाडे कमकुवत होणे, सांधेदुखी, स्नायू आखडणे या समस्या उद्भवत आहेत.
शरीरातील कॅल्शियम आणि व्हिटॅमिन के च्या कमतरतेमुळे हा त्रास होतो. त्यामुळे आहारात तुम्ही पालेभाज्या खाणे महत्वाचे आहे.
पालकमध्ये कॅल्शियम, लोह , व्हिटॅमिन के आणि मॅग्नेशियम ही पोषक घटके असतात यामुळे हाडे आणि स्नायू मजबूत होण्यास मदत होते.
ब्रोकलीला 'सुपरफूड' मानले जाते. यामध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन सी आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते.
स्नायूंची झीज भरून काढण्यासाठी तुम्ही आहारात मटार या भाजीचे सेवन करणे फायदेशीर आहे.
कोबीमध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन के ही पौष्टिक घटके असतात जी हाडे निरोगी ठेवण्यासाठी अत्यंत महत्वाची भूमिका बजावतात.
रताळ्यामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन ए भरपूर असते. हे थकवा दूर करतात.
मेथीच्या पानांमध्ये कॅल्शियम आणि आयर्नचे प्रमाण अधिक असते. मेथी खाल्ल्याने सांधेदुखी आणि हाडांचे दुखणे दूर होतो. स्नायूंना ताकद येते.