ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
ड्रॅगन फ्रूट हे शरीरासाठी खूप आरोग्यदायी फळ आहे. हे फळ शरीराला चांगले पोषक तत्व प्रदान करते.
हे फळ व्हिटॅमिन सी सारख्या अनेक उत्कृष्ट पोषक तत्वांनी समृद्ध असते. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी ड्रॅगन फ्रुटचे सेवन करु शकता.
या फळामध्ये फायबर मुबलक प्रमाणात आढळते. ज्यामुळे पचनसंस्था सुरळीत राहते.
यामध्ये आयरन भरपूर प्रमाणात असते. म्हणून अशक्तपणा जाणवल्यास या फळाचे सेवन करु शकता.
ड्रॅगन फ्रूट हे ओमेगा-3 आणि ओमेगा-9 चा चांगला स्रोत आहे आणि म्हणूनच हृदय निरोगी ठेवण्यासाठी फायदेशीर मानले जाते.
ड्रॅगन फ्रूटचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. म्हणूनच ते मधुमेही रुग्णांसाठी चांगले मानले जाते.
ड्रॅगन फ्रूटमध्ये व्हिटॅमिन सीचे प्रमाण चांगले असल्याने त्वचा आणि केसांसाठी देखील फायदेशीर आहे.