Manasvi Choudhary
मधुमेह रूग्णांसाठी गोड पदार्थ्याचे सेवन टाळले जाते हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. गोड पदार्थ खाणं म्हटलं की डायबिटीज असणाऱ्यांच्या मनात एक भिती निर्माण होते की रक्तातील साखर वाढणार तर नाही ना?
मात्र आज आम्ही तुम्हाला असे ५ गोड पदार्थ सांगणार आहोत ज्याचे सेवन केल्याने रक्तातील साखर वाढणार नाही.
रताळ्यामध्ये नॅचरल शुगर आणि फायबर भरपूर प्रमाणात असते. याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने रक्तातील साखर वेगाने वाढत नाही.
सफरचंद आणि दालचिनी मिक्स खीर बनवा जी आरोग्यासाठी फायदेशीर आहे. दालचिनी शरीरातील इन्सुलिनची संवेदनशीलता सुधारण्यास मदत करते. साखरेऐवजी तुम्ही दालचिनीचा वापर करा.
बाजारातील साखरेच्या मिठाईऐवजी घरी बनवलेले खजूर आणि ड्रायफ्रुटचे लाडू तुम्ही बनवू शकता. साखरेऐवजी तुम्ही खजूरचा वापर केल्यास चवदार लागतील.
चॉकलेट प्रेमींसाठी डार्क चॉकलेट फायदेशीर आहे. यात साखरेचे प्रमाण खूप कमी असते
गाजर आणि बारीक किसलेला ओला नारळ वापरून तुपात खजुराची पेस्ट मिक्स करून लाडू बनवा. साखरेऐवजी गुळाचा वापर करा.