ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
किडनी हा आपल्या शरीराचा एक महत्त्वाचा भाग आहे. हे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास, रक्त स्वच्छ करण्यास मदत करते.
किडनी कॅन्सरची सुरुवातीची लक्षणे कोणती, जाणून घ्या.
जर तुम्हाला रात्री वारंवार लघवी येत असेल तर या लक्षणाकडे दुर्लक्ष करू नका. हे किडनी कॅन्सरचे लक्षण आहे.
जर वजन कोणत्याही कारणाशिवाय अचानक कमी होत असेल तर हे किडनीच्या कॅन्सरचे लक्षण असू शकते.
कोणतेही काम न करता देखील थकवा जाणवत असेल तर हे किडनीच्या कॅन्सरचे लक्षण असू शकते.
वारंवार ताप येणे हे देखील किडनी कॅन्सरचे लक्षण आहे. याकडे दुर्लक्ष करु नका.
पायांना सूज येण्याची अनेक कारणे असू शकतात. यापैकी एक कारण म्हणजे किडनीचा कॅन्सर. पायांना सूज येत असल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा.