Haunted Forts : जगातील ५ सर्वात भयानक किल्ले; सूर्यास्तानंतर जिथे पक्षीही फिरकत नाहीत

Shreya Maskar

भानगड किल्ला

राजस्थानमधील अरवली पर्वतरांगांच्या कुशीत भानगड किल्ला वसलेला आहे. हा शापित केला मानला जातो. येथे दिवसाच्या उजेडातही जायला लोक घाबरतात.

Bhangarh Fort | google

शनिवारवाडा किल्ला

महाराष्ट्रात पुणे येथे शनिवारवाडा किल्ला वसलेला आहे. १८ व्या शतकात बांधलेल्या या किल्ल्याबद्दल अनेक भयानक गोष्टी बोल्या जातात. येथे पौर्णिमेच्या रात्री येथे किंकाळ्या ऐकू येतात.

Shaniwarwada Fort | google

गोलकोंडा किल्ला

गोलकोंडा किल्ला हा हैदराबादमध्ये वसलेला आहे. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण ध्वनी-रचनेसाठी (acoustic architecture) प्रसिद्ध असलेल्या या मध्ययुगीन किल्ल्यात आत्मा वावरत असल्याची चर्चा आहे.

Golconda Fort | google

एडिनबर्ग किल्ला

ज्वालामुखीच्या प्राचीन खडकावर वसलेला एडिनबर्ग किल्ला जवळपास हजार वर्षांपासून उभा आहे. येथे येणारे पर्यटक आणि कर्मचारी यांना काही ठिकाणी अचानक थंडी जाणवणे, अदृश्य पावलांचे आवाज ऐकू येणे आणि तळघरांमध्ये सावल्यांसारखे आकार दिसणे असे अनुभव येतात.

Edinburgh Castle | google

फोर्ट जॉर्ज

स्कॉटलंड येथे फोर्ट जॉर्ज आहे. १८ व्या शतकातील या लष्करी किल्ल्यात रहस्यमय पावलांचे आवाज ऐकू येतात.

Fort George | google

अकेरशुस किल्ला

नॉर्वे येथे अकेरशुस किल्ला वसलेला आहे. ओस्लो बंदराकडे पाहणारा हा मध्ययुगीन किल्ला १२९९ मधील आहे आणि त्याला फाशीच्या शिक्षेचा काळा इतिहास आहे.

Akershus Castle | google

कॅस्टिलो डी सॅन मार्कोस

अमेरिकेच्या मुख्य भूभागावरील हा सर्वात जुना दगडी किल्ला आहे. हा किल्ला जुन्या रक्ततरंजित इतिहास, युद्धे आणि तिथे घडलेल्या भयानक घटनांमुळे खूप भयानक आणि भीतीदायक मानला जातो.

Castillo de San Marcos | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | google

NEXT :  उभ्या कातळ पायऱ्या अन् दोन्ही बाजूंना खोल दरी! 'या' किल्ल्याची चढाई पाहूनच उडेल धडकी

Dangerous Fort | AI PHOTO
येथे क्लिक करा...