Shreya Maskar
बदलापूर हे महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात वसलेले एक सुंदर ठिकाण आहे. पावसाळ्यात येथे नक्की वन डे ट्रिप प्लान करा. सुंदर ठिकाणांची यादी आताच नोट करा.
कोंडेश्वर मंदिर आणि धबधबा हिरव्यागार टेकड्यांच्या कुशीत वसलेले आहे. येथे भगवान शंकराचे प्राचीन दगडी मंदिर आणि त्यासोबतच एक सुंदर, खळाळणारा धबधबा आहे.
मुख्य शहरापासून थोड्या अंतरावर असलेले हे विशाल जलाशय परिसराला पाणीपुरवठा करते आणि एक शांत व सुंदर पार्श्वभूमीही प्रदान करते. पावसाळ्यात तुम्ही बारवी धरण- नदी येथे सुंदर फोटोशूटचा आनंद घेऊ शकता. सरोवराच्या काठावर मोकळ्या हवेत जेवणाचा आनंद घेणे आणि सूर्यास्त पाहण्याची मजा काही औरच आहे.
बदलापूर आणि अंबरनाथ यांच्या दरम्यान चिखलोली धरण वसलेले आहे. पक्षी निरीक्षण, हायकिंग आणि शहराच्या गोंगाटापासून दूर सरोवराच्या काठावर शांत विश्रांतीसाठी येथे नक्की जा.
मुळगाव हे बदलापूरजवळील हे एक छोटेसे, ग्रामीण वातावरणाने नटलेले गाव आहे. जे टेकडीवरील भगवान खंडोबाच्या ऐतिहासिक मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. येथे अस्सल ग्रामीण जीवनाचा अनुभव घेता येतो. येथे दरीचे विहंगम दृश्य पाहायला मिळते.
बदलापूरपासून सुमारे 12 किमी अंतरावर, हा ऐतिहासिक आणि आव्हानात्मक डोंगरी किल्ला मालडुंगेजवळ उभा आहे. येथून आसपासच्या कोकण प्रदेशाच्या विहंगम दृश्य पाहायला मिळते. येथे ट्रेकिंगचा आनंद घ्या.
बदलापूरजवळ अनेक उद्याने - रिसॉर्ट्स आहे. वीकेंडला कुटुंबासोबत आणि मित्रांसोबत स्टेकेशनसाठी हे सुंदर ठिकाण आहे.
वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.