ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
बरेच लोक तक्रार करतात की दररोज दात घासल्यानंतर आणि तोंडाच्या स्वच्छतेची काळजी घेतल्यानंतरही दातांचा पिवळापणा कमी होत नाही.
दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी 5 प्रभावी घरगुती उपाय कोणते, जाणून घ्या.
केळीच्या सालीचा पांढरा भाग दातांवर घासून ५ मिनिटे तसेच राहू द्या. त्यानंतर, हलक्या हाताने ब्रश करा. यामुळे तुमच्या दातांमधील घाण आणि पिवळेपणा हळूहळू निघून जाईल.
ताज्या कडुलिंबाच्या काडीला हलकेच चावा आणि ब्रश म्हणून वापरा. कडुलिंबामध्ये अँटीफंगल आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात ज्यामुळे तोंडाचे आरोग्य सुधारते आणि दातांचा रंग साफ होतो.
आवळा व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध आहे. १ चमचा आवळ्याचा रस एक कप पाण्यात मिसळा आणि गुळण्या करा. हा उपाय केवळ दात पांढरे करत नाही तर हिरड्या देखील मजबूत करतो.
ओल्या ब्रशवर १ थेंब लवंगाचे तेल घालून दात घासा. नियमित २१ दिवसापर्यंत हा उपाय केल्याने दातांचा पिवळेपणा कमी होतो.
संत्र्याची साल आणि तमालपत्र उन्हात वाळवा आणि त्यांची पावडर बनवा. या पावडरने दात घासून घ्या. या दोन्ही घटकांमध्ये नैसर्गिकरित्या दात पांढरे करण्याचे गुणधर्म आहेत ज्यामुळे पिवळेपणा दूर होईल .