Manasvi Choudhary
श्रावण आणि पावसाळा म्हणजे महाराष्ट्रातील निसर्गसौंदर्य. हिरवाई, धबधबे, डोंगर आणि धुक्याने नटलेली अनेक ठिकाणे पर्यटकांना आकर्षित करतात.
लोणावळा-खंडाळ्याव्यतिरिक्त महाराष्ट्रातही अनेक सुंदर पर्यटनस्थळे आहेत. श्रावणात तुम्ही प्रसिद्ध ठिकाणांना भेट द्या.
श्रावण महिना हा धार्मिक महिना मानला जातो. श्रावणात संपूर्ण वातावरण शिवमय होते. या पवित्र महिन्यात महादेवाच्या दर्शनासाठी तुम्ही विविध शिव मंदिरांना भेट देऊ शकता.
भिमाशंकर हे १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. भिमाशंकर हे सह्याद्रीच्या दाट जंगलात वसलेले आहे. श्रावणात येथील निसर्ग अतिशय सुंदर दिसते.
नाशिकमध्ये ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी आणि गोदावरी नदीच्या उगमस्थानी त्र्यंबकेश्वर मंदिर आहे. श्रावणात या ठिकाणी भक्ताची गर्दी पाहायला मिळते.
परळी वैजनाथ हे बीड मराठवाड्यातील हे प्रसिद्ध ज्योतिर्लिंग श्रावण महिन्यात दर्शनासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. येथे देशभरातून भाविक गर्दी करतात. शांत आणि आध्यात्मिक वातावरणामुळे श्रावणात या मंदिरातील दर्शन घेण्याने मनाला विलक्षण शांतता लाभते.
पुरंदर तालुक्यात टेकडीवर वसलेले हे १३ व्या शतकातील अतिशय सुंदर आणि ऐतिहासिक शिवमंदिर आहे
मुंबईजवळ ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथील 'प्राचीन शिवमंदिर' इतिहास आणि भक्तीचा अनोखा संगम आहे.