Dhanshri Shintre
जैसलमेर शहर सोनेरी वाळवंटात वसलेले आहे, जिथे पिवळ्या वाळूच्या भव्य इमारती आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा पर्यटनांना आकर्षित करतो.
दूरून दिसणारे जैसलमेर शहर सोनेरी वाळूत चमकणाऱ्या मोत्यासारखे आहे, जे त्याच्या भव्य वास्तुकला आणि ऐतिहासिक वारशामुळे ओळखले जाते.
हिवाळ्यात तुम्ही भेट देऊ शकणारी खास ठिकाणे आणि आकर्षक पर्यटनस्थळे आम्ही तुम्हाला सविस्तर मार्गदर्शन करून सांगतो.
थारच्या सोनेरी वाळवंटात वसलेला जैसलमेर किल्ला सोनेरी राजवाड्यासारखा भासतो. हा भव्य किल्ला राजस्थानी स्थापत्यकलेचे अप्रतिम उदाहरण असून सुमारे ५,००० लोकांचे निवासस्थान आहे.
बडा बागेतील व्यास छत्री जैसलमेरच्या समृद्ध वारशाचे विशेष दर्शन घडवते. सोनेरी वाळूच्या दगडातील कोरीव काम आणि राजस्थानी वास्तुकला पाहून तुम्ही मंत्रमुग्ध व्हाल.
जैसलमेरच्या बाहेरील गडीसर तलाव शहराच्या गजबजाटापासून दूर निसर्गप्रेमींना शांती देतो. १४व्या शतकातील हा तलाव एकेकाळी पाण्याचा मुख्य स्रोत आणि आज पर्यटनस्थळ आहे.
खाबा किल्ला, जैसलमेरजवळील अद्वितीय आणि रहस्यमय स्मारक, कुलधारा गावाजवळ आहे. पालीवाल ब्राह्मण येथे राहत होते, पण एका रहस्यमय घटनेनंतर अचानक गायब झाले.
सॅम सँड ड्यून्स सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी जादुई दृश्य देतात. येथे जीप सफारी, उंट सवारी आणि रात्री वाळवंटात कॅम्पिंगचा अनुभव घेता येतो.