Manasvi Choudhary
शरीराला निरोगी आणि कार्यक्षम ठेवण्यासाठी कॅल्शियम हा अत्यंत महत्त्वाचा घटक मानला जातो.
हाडे आणि दात मजबूत करण्यासाठी कॅल्शियमची सर्वाधिक गरज असते. अनेकांना असं वाटते की, शरीरात कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी दूध पिणे महत्वाचे आहे.
मात्र तुम्हाला माहितीये का? केवळ दूध प्यायल्याने नाही तर स्वयंपाकघरातील 5 पदार्थांमध्ये दुधापेक्षा जास्त कॅल्शियम आहे.
डाएटमध्ये नाचणी खाताता. नाचणीमध्ये कॅल्शियमचे प्रमाण अधिक असते यामुळे हाडांच्या बळकटीसाठी नाचणीचे सेवन फायदेशीर मानले जाते.
पांढऱ्या तिळामध्ये कॅल्शियमची मात्रा असते. अगदी एक-दोन चमचे तीळ खाल्ल्यानेही शरीराला भरपूर कॅल्शियम मिळते.
तुम्हाला जर गोड खाण्याची आवड असेल तर तुम्ही अंजीर खा. अंजीरमध्ये पोटॅशियम आणि फायबरचे मुख्य घटक असतात ज्यामुळे हाडे दिर्घकाळ मजबूत ठेवण्यास मदत होते.Almond
बदाम खाल्ल्याने केवळ स्मरणशक्तीच नाही तर हाडांच्या आरोग्यासाठी फायदा होतो. बदामामध्ये हेल्दी फॅट्ससोबतच भरपूर कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असते.
पालक, मेथी, तांदुळजा यासारंख्या हिरव्या पालेभाज्यांमध्ये लोह सोबतच कॅल्शियमची मात्रा अधिक असते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.