Saam Tv
थंडीच्या दिवसात आपल्या शरीराला उबदार ठेवण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी फळांचा समावेश आपल्या आहारात करणे खूप महत्त्वाचे आहे.
फळे खाल्याने कार्बोहायड्रेट्समुळे शरीरात ऊर्जा निर्माण होते. थंडीत खाण्यासाठी योग्य आणि फायदेशीर फळे पुढील पैकी आहेत.
संत्रे विटामिन सीचा उत्तम स्रोत आहेत जे आपल्या रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात. त्यात असलेले एंटीऑक्सिडंट्स शरीरातील सूज कमी करण्यास मदत करतात.
डाळिंबात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी, पोटॅशियम आणि फायबर असते. हे हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले असते आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
सीताफळात विटामिन सी, व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात. हे पचनक्रिया सुधारते आणि त्वचेचे आरोग्य सुधारते.
केळी पोटॅशियमचा उत्तम स्रोत आहेत जे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. ते ऊर्जा देतात आणि शरीरातील पाणी टिकवून ठेवण्यास मदत करतात.
ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी आणि रास्पबेरी यांसारख्या बेरीज विटामिन सी, फायबर आणि एंटीऑक्सिडंट्सचा उत्तम स्रोत आहेत.
पोटॅशियम आणि एंटीऑक्सिडंट्स हृदयाचे आरोग्य सुधारतात. फळे सकाळी खाली उठून किंवा जेवणाच्या एक तास आधी खाणे चांगले असते.
फळांचा रस प्यायल्याने फायबर मिळत नाही. म्हणून संपूर्ण फळे खाणे अधिक फायदेशीर असते.