Manasvi Choudhary
सकाळची कामाला जाण्याची महिलांचा धावपळ असते. अशावेळी कमी वेळेत नवऱ्यासाठी हेल्दी आणि टेस्टी नाश्ता बनवल्यास शरीराला उर्जा मिळते
सकाळी कोणते नाश्ता प्रकार बनवायचे याविषयी जाणून घेऊया.
महाराष्ट्रीयन घरांमध्ये सर्वात लोकप्रिय नाश्ता म्हणजे कांदापोहे. पोहे पचायला हलके आणि झटपट बनतात.
ज्वारी, गहू, बाजरी, नाचणी, बेसन या धान्यांच्या पिठाचे थालीपीठ चवदार बनते. यात तुम्ही किसलेली काकडी किंवा दुधी भोपळा, लसूण, कोथिंबीर ओवा हे मिश्रण मिक्स करा.
जर वेळ कमी असेल, तर भाजलेल्या रव्याचा उपमा हा उत्तम पर्याय आहे. यात गाजर, मटार आणि बीन्स घालून तो अधिक आरोग्यदायी बनवता येतो.
नॉनव्हेज खात असल्यास मसाला ऑम्लेट आणि टोस्टेड ब्रेड हा ५ मिनिटांत होणारा नाश्ता आहे.
चटणी, भाज्या चिरणे किंवा डाळ भिजवणे ही कामे आदल्या रात्री केल्यास सकाळी वेळ वाचतो.