Limbu Pani: तापलेल्या उन्हात थंडावा देणारे लिंबूपाणी बनवण्याच्या ३ अनोख्या पद्धती

Dhanshri Shintre

उन्हाळा

सध्या दिवसा आणि रात्री थंडी आणि दुपारी मात्र उन्हाचे चटके बसत आहेत.

Limbu Pani | Freepic

लिंबूपाणी

उन्हाळ्यातील उष्णतेपासून सुटका मिळवण्यासाठी अनेक जण लिंबूपाण्याचा आनंद घेतात. त्याचा थंडावा आणि ताजेतवानेपणा उन्हाळ्यातील हवामानासाठी उत्तम पर्याय ठरतो.

Limbu Pani | Freepic

पाण्याची कमतरता

लिंबूपाणी शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढते आणि घरी ते सहजपणे तयार करून उन्हाळ्यात ताजेतवाने वाटते.

Limbu Pani | Freepic

लिंबूपाणीच्या तीन नव्या पद्धती

तुम्हाला साधे लिंबू पाणी पिऊन कंटाळा आला असेल तर आम्ही लिंबूपाणी बनवण्याच्या तीन नव्या आणि स्वादिष्ट पद्धती सुचवल्या आहेत.

Limbu Pani | Freepic

अनोखी चव

यामुळे तुम्हाला अनोखी चव मिळेल आणि उन्हाळ्याच्या उष्णतेपासून ताजेतवाने होण्याचा अनुभवही घेता येईल. चला जाणून घेऊया.

Limbu Pani | Freepic

पुदिना लिंबूपाणी

उन्हाळ्यात पुदिना लिंबूपाणी बनवण्यासाठी १/४ कप पुदिना, २ चमचे साखर, ५ चमचे लिंबाचा रस मिसळून पेस्ट तयार करा.

Limbu Pani | Freepic

मिश्रण मिक्स करा

एका ग्लास पाण्यात पुदिन्याची पेस्ट मिसळा, लिंबाचा रस घाला, नीट ढवळा, आणि स्वादिष्ट पुदिना लिंबूपाणी तयार करा.

Limbu Pani | Freepic

मसाला लिंबू सोडा

मसाला लिंबू सोडा तयार करण्यासाठी धणे पावडर, काळी मिरी, चाट मसाला, जिरे पावडर, काळं मीठ, साखर, आणि लिंबाचा रस घ्या.

Limbu Pani | Freepic

सोडा मिसळा

एका ग्लासमध्ये १ कप सोडा पाणी मिसळा, बर्फाचे तुकडे घाला आणि मसाला लिंबू सोडा तयार करून आनंद घ्या.

Limbu Pani | Freepic

नारळ लिंबू सरबत

उन्हाळ्यात वेगळ्या चवीसाठी नारळ लिंबू सरबत बनवा. एका ग्लासात नारळ पाणी घ्या आणि त्यात ४ चमचे पिठीसाखर घाला.

Limbu Pani | Freepic

फ्रीजमध्ये ठेवा

मिश्रणात २ चमचे आल्याचा रस, लिंबाचा रस मिसळा आणि फ्रीजमध्ये ठेवा. २ तासांत थंड नारळ लिंबू सरबत तयार होईल.

Limbu Pani | Freepic

NEXT: पाणीपुरीच्या गाडीवर लाल कपडा का असतो? जाणून घ्या यामागचे खास कारण

येथे क्लिक करा