कोमल दामुद्रे
मुलांची शाळा सुरु झाल्यानंतर पालकांना टेन्शन येते ते टिफिन बॉक्सची.
मुलांना आवडेल व पोट भरेल असे पदार्थ आपण मुलांना खाऊ घालण्याचा विचार करतो.
मुलांसाठी निरोगी आणि पौष्टिक जेवणाचा डबा पॅक करण्याचा विचार येतो, तेव्हा आपण त्यांच्या टिफिनमध्ये पॅक केलेल्या अन्नाचा प्रकार लक्षात घेतला पाहिजे.
ब्रेड जॅमसह असे अनेक पर्याय आहेत, जे आम्ही आमच्या मुलांच्या टिफिन बॉक्सचा एक भाग बनवतो.
पण असे अनेक पदार्थ आहेत, जे तुमच्या मुलांच्या आरोग्यदायी जेवणाच्या डब्याला पर्याय असू शकत नाहीत.
तुम्ही शाळेसाठी मुलाचा टिफिन पॅक करत असाल तर जेवणाच्या डब्यात नूडल्स किंवा मॅगी ठेवू नका. हे मुलांच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे.
अनेक वेळा पालक मुलांच्या टिफिनमध्ये उरलेली करी किंवा भाजी टिफिन बॉक्समध्ये पॅक करतात. पण दुपारच्या वेळी हे पदार्थ खराब होतात ज्यामुळे त्यांना फूड पॉइझन होऊ शकते.
जास्त तळलेले अन्न देखील आरोग्यासाठी हानिकारक आहे. फ्रेंच फ्राईज, बटाटा चिप्स आणि तळलेले चिकन नगेट्स यांसारख्या पदार्थांमध्ये अस्वास्थ्यकर चरबी आढळते. त्यामुळे त्यांचे वजन वाढू शकते.