High Blood Pressure : हाय बीपी काही मिनिटांत होईल कमी, फक्त करा 'हे' छोटं काम

Shreya Maskar

हाय ब्लड प्रेशर

अनेकदा ताणामुळे, अतिरिक्त कामामुळे, जंक फूडमुळे अचानक रक्तदाब वाढतो. अशावेळी घाबरून न जाता त्वरित हे तीन सोपे उपाय करा.

High blood pressure | pinterest

दीर्घ श्वासोच्छ्वास

हृदयाचे ठोके मंदावण्यासाठी शांत बसा आणि ५ मिनिटे हळू व दीर्घ श्वास घ्या. एका ठिकाणी लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करा. डोक्यात इतर कोणतेही विचार आणी नका.

Deep breathing | pinterest

पाणी प्या

शरीरातील पाण्याचे प्रमाण थोडे कमी झाल्यामुळेही कधीकधी रक्तदाबाची पातळी वाढू शकते; त्यामुळे एक ग्लास साधे पाणी हळूहळू प्यायल्याने फायदा होऊ शकतो. पाणी जास्त गरम किंवा जास्त थंड नसावे.

drink water | pinterest

विश्रांती घ्या

एखाद्या शांत व आरामदायक ठिकाणी बसा आणि घट्ट कपडे किंवा तणाव निर्माण करणाऱ्या गोष्टी दूर करा. काही मिनिटे डोळे बंद करून पडून रहा.

take rest | pinterest

थंड पाणी

थोडे साधारण थंड पाणी चेहऱ्यावर शिंपडा. तुम्ही डोळ्यांवर थंड पाण्याची पट्टी देखील ठेवू शकता. यामुळे हृदयाची गती कमी होते आणि रक्तदाबाची पातळी कमी होते.

cold water | pinterest

शारीरिक हालचाल

उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवल्यास बसूनच काही शारीरिक हालचाली करा. उदा. डोळे घट्ट मिटा आणि नंतर सोडा, मुठी आवळा आणि नंतर उघडा. या तंत्रामुळे शरीरातील तणाव कमी होतो आणि तुम्हाला त्वरित आराम वाटतो.

physical activity | pinterest

रोज कोणती काळजी घ्यावी?

रक्तदाब नियंत्रणात ठेवायचा असेल, तर तुमच्या आहारात मीठ कमी करा आणि जंक फूड, पॅकबंद स्नॅक्स टाळा. तसेच, नियमित शारीरिक व्यायाम करा आणि वेळेवर झोपा.

salt | pinterest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | pinterest

NEXT : फक्त हृदयच नाही, हाय BPचा किडनीवरही होतो गंभीर परिणाम, 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका

High blood pressure | AI PHOTO
येथे क्लिक करा...