ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
भारतरत्न, लोहपुरुष, राष्ट्रीय एकात्मतेचे शिल्पकार, आधुनिक भारताचे शिल्पकार, सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती दरवर्षी ३१ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरी केली जाते.
पंतप्रधान मोदी यांनी २०१८ रोजी गुजरात येथे ५९७ फुट उंच सरदार वल्लभभाई पटेल यांची जगातील सर्वात उंच मुर्तीची स्थापना केली.
"जोपर्यंत माणूस तो हक्क मिळवण्यासाठी किंमत देत नाही तोपर्यंत अधिकार माणसाला आंधळे ठेवतील."
"तुमचा अपमान सहन करण्याची कला तुम्हाला अवगत आहे."
"माझी एकच इच्छा आहे की भारत चांगला उत्पादक देश असावा आणि अन्नासाठी अश्रू ढाळताना या देशात कोणीही उपाशी राहू नये."
"जेव्हा जनता एकजूट असते, तेव्हा अत्यंत क्रूर राजवटही त्यांच्यापुढे टिकू शकत नाही.त्यामुळे जाती-पातीचा उच्च-नीच भेद विसरून सर्वांनी एक व्हा."
"संस्कृती मुद्दाम शांततेवर बांधली जाते.जर त्यांना मरावे लागले तर ते त्यांच्या पापांमुळे मरतील.जे काम प्रेमाने आणि शांततेने केले जाते ते वैरभावाने होत नाही."