ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
जेवणानंतर शतपावली केल्यामुळे गॅस्ट्रोइंटेस्टाईनल ट्रॅकला उत्तेजित केल्यामुळे शरीरातील जेवण पचण्यास मदत होते.
चालल्यामुळे शारीरिक हालचाल होते, शरीरातील कॅलरीज बर्न होतात, वजन नियंत्रित राहते.
रात्री शतपावली केल्यामुळे स्नायूंमधून ग्लुकोजचे शोषण वाढवून आणि इन्सुलिन सुधारून रक्तातील साखरेची पातळी वाढवते.
शतपावली केल्यामुळे आपले वजन नियंत्रणात राहते आणि जेवण देखील उत्तम पद्धतीने पचते.
चालण्याचा स्पीड योग्य पद्धतीने जर ठेवला, तर छातीत जळजळ आणि ॲसिडीटी कमी होते.
जास्त चालल्यामुळे स्ट्रेस कमी होतो, झोप योग्य पद्धतीने लागते आणि प्रामुख्याने रात्रीची शांत झोप लागते.
शतपावली केल्यामुळे एंडॉर्फिन बाहेर पडतात, त्यामुळे तुमचे नैसर्गिक राहणीमान उत्तम ठेवते, स्ट्रेस कमी ठेवते आणि आपले मन देखील शांत ठेवते.
चालल्यामुळे विचार क्षमतेत अधिक भर पडते आणि त्यामुळे आपण नवीन कल्पना करतो.
जर शतपावली, कुटुंबातील सदस्य, मित्र आणि पाळीव प्राण्यासोबत केली तर आपले त्यांच्यासोबतचे नाते आणखीच घनिष्ट होते.
शतपावली केल्यामुळे हृदय उत्तम राहते, एकाग्रता क्षमता वाढते, रक्त वाहिन्यांमधील आरोग्य सुधारते.