Sakshi Sunil Jadhav
खान्देशी उडीद वडे हे तिथल्या सणाराला केले जातात. साध्या साहित्यांतून तयार होणारे हे वडे खास झणझणीत चवीसाठी ओळखले जातात.
या मेदू वड्यांसाठी पांढरी उडीद डाळ 6 ते 8 तास भिजवून घट्टसर वाटली जाते. पाणी न वापरता वाटल्यामुळे वडे खूपच मऊ आणि खुसखुशीत होतात.
हिरव्या मिरच्या, आलं, लसूण, जिरं आणि धणे यांचा वापर केल्याने वड्यांना खास खान्देशी तिखटपणा मिळतो.
जिरे आणि धणे जाडसर ठेचून बॅटरमध्ये मिक्स केल्याने वड्यांची चव आणि सुगंध जास्त वाढतो.
बारीक चिरलेला कडीपत्ता आणि चिमूटभर हिंग यामुळे वड्यांना पारंपरिक घरगुती चव येते.
थोड्या प्रमाणात बेकिंग सोडा घातल्यामुळे वडे आतून मऊ आणि बाहेरून खरपूस होतात.
ओल्या सुती कापडाने झाकलेल्या वाटीवर वडे थापल्यामुळे त्यांना योग्य आकार मिळतो आणि तेलात सोडताना वडे तुटत नाहीत.
सोनेरी रंग येईपर्यंत तळलेले हे वडे हिरव्या चटणीसोबत किंवा चहा-बरोबर खाल्ले तर चव दुप्पट करतात.