Sakshi Sunil Jadhav
पिंपल्स बरे झाल्यानंतर चेहऱ्यावर राहणारे काळे डाग (Dark Spots) आणि हायपरपिग्मेंटेशन ही अनेकांची मोठी समस्या असते. हे डाग लगेच जात नाहीत, मात्र योग्य काळजी घेतल्याने ते हळूहळू कमी होऊ शकतात.
पिंपलमुळे त्वचेवर सूज येते. ही सूज बरी होताना शरीर त्या भागात जास्त मेलनिन तयार होतं. त्यामुळे पिंपल गेले तरी त्या ठिकाणी काळा डाग राहतो.
हेल्थ तज्ज्ञांच्या मते, पिंपलचे डाग जायला किमान काही आठवडे किंवा महिने लागू शकतात. या दिवसात त्वचेला जास्त इजा करु नका.
उन्हातील UV किरणांमुळे मेलनिन जास्त सक्रिय होतं. त्यामुळे रोज बाहेर जाण्यापूर्वी ब्रॉड स्पेक्ट्रम सनस्क्रीन लावणं अत्यावश्यक आहे.
Vitamin C त्वचेला उजळवायला खूप मदत करतं. त्याने मेलनिनचं प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होते. तसेच डार्क स्पॉट हळूहळू फिके होतात.
रेटिनॉल, एजेलिक अॅसिड आणि कोजिक अॅसिड त्वचेचा सेल टर्नओव्हर वाढवतात. पण हे डॉक्टरांच्या सल्ल्या शिवाय घेणं टाळा.
अॅलोवेरा जेल त्वचेला शांत करतं. दही किंवा ताकातील लॅक्टिक अॅसिड डेड स्कीन काढून नवीन त्वचा तयार करतं.
जर दाग खूप खोलवर गेले असतील तर केमिकल पील, मायक्रोडर्माब्रेशन किंवा लेझर ट्रीटमेंटचा सल्ला त्वचारोगतज्ज्ञ देऊ शकतात.
नियमित चेहरा स्वच्छ ठेवा, मॉइस्चरायझर वापरा, सनस्क्रीन आणि योग्य स्किन केअर रूटीन रोज फॉलो करा. त्याने त्वचा हळूहळू स्वच्छ दिसायला लागेल.