Sakshi Sunil Jadhav
थंडीमुळे केस खूप सुके आणि अन् हेल्दी होतात. त्यात लोक नियमित ऑयलिंग करणंही टाळतात.
रोज ऑयलिंगमुळे केसांना आवश्यक पोषण मिळतं, केस वेळेआधी पांढरे होत नाहीत आणि डोक्यातली खाज, डँड्रफसारख्या समस्या कमी होतात.
तेल कसे आणि किती वेळ मालिश करून लावायचे, हे महत्त्वाचे आहे. चुकीच्या पद्धतीने तेल लावल्याने केसांचं नुकसान होऊ शकतं.
डोक्याची मालिश करताना हाताच्या तळव्यांऐवजी बोटांचा (fingertips) वापर करा.
बोटांनी हळूहळू गोलाकार हालचाली करत स्काल्पवर मालिश करा. त्याने रक्ताभिसरण सुधारतं.
मालिश करताना डोके जोरजोरात हलवू नये किंवा केस रगडू नयेत. यामुळे केस तुटण्याची शक्यता असते.
दोन्ही कानांच्या खाली आणि मानेच्या मागील बाजूला अंगठ्याने हलका दाब देत गोलाकार मालिश केल्याने ताण कमी होतो.
सामान्य केस असतील तर आठवड्यातून 1 वेळा, तर कोरडे केस असतील तर आठवड्यातून 2 वेळा तेलाने मालिश करा.
तेलाने मालिश केल्यानंतर गरम पाण्यात भिजवलेला टॉवेल 5 मिनिटे डोक्यावर ठेवावा. यामुळे केसांच्या मुळांपर्यंत तेल पोहोचतं.