Credit Card Tips : क्रेडिट कार्ड वापरताना या चुका अजिबात करु नका, कर्जाच्या जाळ्यात अडकाल

साम टिव्ही ब्युरो

क्रेडिट कार्ड वापरताना काळजी घेतली नाहीत तर तुम्ही कर्जाच्या विळख्यात अडकू शकता.

Credit Card | Saam Tv

अनेकदा क्रेडिट कार्डधारकांकडून क्रेडिट कार्डच्या थकीत रकमेवर जास्त व्याज भरावे लागते. त्यामुळे क्रेडिट कार्ड वापरताना काय काळजी घ्यावी यावर एक नजर टाकूया.

Credit Card | Saam Tv

तुमच्याकडे क्रेडिट कार्ड असल्यास आणि तुम्ही दुसरे क्रेडिट कार्ड देखील घेत असाल, तर सर्वप्रथम तुम्हाला त्याची गरज आहे का हे पाहावे लागेल? गरज नसेल तर दुसरे क्रेडिट कार्ड घेऊ नका.

Credit Card | Saam Tv

क्रेडिट कार्डवर अधिक ट्रान्झॅक्शन केल्याने तुमच्यावरील कर्ज वाढू शकते. यासोबतच क्रेडीट कार्ड कुठे वापरलं जातंय हेही लक्षात ठेवायला हवं. जर तुम्ही जास्त पैसे खर्च केले आणि ते परत करू शकत नसाल तर तुम्ही अडचणीत येऊ शकता.

Credit Card | Saam Tv

अनेकजण CIBIL स्कोअर वाढवण्यासाठी क्रेडिट कार्डच्या मर्यादेइतकेच पैसे काढतात आणि गरज नसतानाही ते खर्च करतात. मात्र परतफेडीसाठी पुरेसे पैसे नसल्याने ते कर्जाच्या बोजाखाली अडकतात.

Credit Card | Saam Tv

अनेकदा लोक क्रेडिट कार्डमधून पैसे काढून ते खर्च करतात आणि ते EMI मध्ये कन्वर्ट करतात.

Credit Card | Saam Tv

यामुळे त्यांना व्याजासह जास्त रक्कम भरावी लागत आहे. तसेच कोणताही हप्ता चुकला तर अडचणी वाढू शकतात.

Credit Card | Saam Tv