ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
तुळशीमध्ये औषधी गुणधर्मांचा भरपुर प्रमाणात समावेश असतो.
सर्दी, खोकला झाल्यानंतर तुळशीचे पाणी प्यायल्यास सर्दी खोकल्यापासून आराम मिळतो.
तुळस ही शरीराबरोबर त्वचेसाठी सुद्धा खूप गुणकारी आहे.
आपल्याला तुळस बाजारात सहज उपलब्ध होवून जाते.
तुळशीच्या सेवनाने रोगप्रतिकारशक्ती सुधारते, पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.
तुळशीच्या पानांमधल्या अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्मांमुळे पिंपल्स नाहीसे होतात.
तुळशीमध्ये ॲडाप्टोजेन नावाचा घटक असतो त्याने ताण कमी होतो.
तुळशीच्या पानांचे सेवन केल्यामुळे नियमित सेवन केल्यास मन शांत होते.