Surabhi Jagdish
मेष
कामासाठी प्रवास, भटकंती, वणवण, त्रास या सगळ्या गोष्टी आज संभवतात. तुमच्या वरिष्ठांच्या कडून त्याचे विशेष कौतुक होणार आहे.
वृषभ
कलासक्त आयुष्य असावं असं वाटू शकतं. लक्ष्मी उपासना विशेष फलदायी ठरणार आहे. निसर्गरम्य ठिकाणी सहलीचे योग येऊ शकतात.
प्रेमात अपयश मिळण्याची शक्यता आहे. आज स्वतःला थोडे बदलावं लागणार आहे. आपल्यासारखे जग चांगले नसते हे जाणवू शकले.
जोडीदाराबरोबर बद्दल अभिमान वाटावा अशा काही गोष्टी आज घडू शकतात. एकमेकांची मान उंचावेल असे प्रेम राहील. आयुष्यामध्ये चांगल्या संधी मिळू शकतात.
नातेवाईकांकडून विशेष फायदा होण्याचा आजचा दिवस आहे. आपल्या वस्तू, जिन्नस सांभाळा. नोकर वर्गापासून सावधगिरी बाळगावी.
विशेष विष्णू उपासना आज फळाला येईल. जप,मंदिरामध्ये दर्शन या गोष्टी करा. पैशांमध्ये वाढ होईल. धन संचय चांगला राहील.
गृहसौख्य, वाहनसौख्य, मातृसौख्य या दृष्टीने दिवस चांगल्या गोष्टी देणारा असणार आहे. आपल्या मार्गाने जात राहा. प्रेमाने इतरांच्या सर्व गोष्टी करा.
आजच्या दिवसी लहान प्रवास घडतील. प्रवासामध्ये अडचणी येऊन ठेपणार आहेत. आपल्यातला एक वेगळा आयाम तुम्हाला भारून टाकणार आहे.
गोडधोडाच्या पंगती तुमच्या घरी उठणार आहेत. कुटुंबीयांमध्ये एखादे छोटे कार्य घरामध्ये पार पडेल. ठरलेल्या गोष्टी सहज पार पडतील.
उदासी आणि मरगळ आज झटकून टाका. नवीन काहीतरी कपडे किंवा अलंकार खरेदी होईल. स्वतःचे अस्तित्व वेगळेपणाने जाणवेल. अंर्तमग्न व्हाल.
अनाठही पैसा खर्च होईल. काही मुद्द्यांवर इतरांशी विनाकारण वाद होतील.
मित्रांच्या सहकार्याने मन भरून येईल. वेळेला अडचण असेल तरीसुद्धा कोणाची तरी मदत होईल. प्रेमामध्ये लाभ आहेत.