Surabhi Jayashree Jagdish
ठरवेल ते होईल असं म्हटलं तर ते नशीब कोणतं! साध्या साध्या दैनंदिन गोष्टी आहेत त्या सुद्धा रखडण्याची शक्यता आहे.
महत्त्वाची कामे शक्यतो दुपारपूर्वी उरकून घ्या. मात्र कितीही झाले तरी आज कामाच्या ठिकाणी जिद्दीने कार्यरत रहाल.
खूप काही ठरवून गोष्टी करूच नका. वेळ आणि पैसा वाया जाण्याची शक्यता आहे.
शिव उपासना फलदायी ठरणार आहे. मनोबल आणि आत्मविश्वास वाढवणाऱ्या घटना घडतील.
तुमचे कार्यक्षेत्र आज वाढणार आहे. नवनवीन दिशा आणि आशा यांनी भरलेला आजचा दिवस असेल.
एखादी महत्त्वाची जबाबदारी अंगावर येऊन पडेल. स्वतःमधील गट फीलिंगला विशेष केंद्रस्थानी माना.
मनामध्ये आनंदाचे किरण फुलतील. आनंददायी वातावरण असेल. विविध आर्थिक लाभ होण्याचा आजचा दिवस आहे.
आयुष्यात एखादी घटना अशी घडेल की ज्यामुळे तुमचा उत्साह आणि उमेद वाढणार आहे. मनात ठरवलेल्या गोष्टी करणारच असे ध्येय असेल.
काही ना आरोग्याच्या तक्रारी त्रस्त करून सोडतील. वाहने जपून चालवण्याची सावधगिरीचा इशारा आज आहे.
महत्त्वाचे पत्र व्यवहारात पार पडणार आहेत. जवळचे स्नेहीजन, प्रियजनांच्या सहवासामध्ये आजचा दिवस व्यस्त राहील.
प्रॉपर्टी सौख्य चांगले लागणार आहे. दैनंदिन कामे मार्गी लागतील. कामाच्या ठिकाणी मोठ्या लोकांच्या ऊठबस होईल.
वैचारिक मतपरिवर्तन होण्याचा आजचा दिवस आहे. महत्त्वाची कामे मार्गी लागणार आहेत.