ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
रखडलेली कामे मार्गी लागणार आहेत. मानसिक स्वास्थ आणि समाधान यांनी भारलेला उद्याचा दिवस आहे. मनातील सर्व गोष्टी पूर्ण होण्यासाठी धडपड कराल आणि त्या प्राप्त होतील.
काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. आपल्या जवळच्या लोकांकडून अपेक्षित सहाय्य मिळेल. हितशत्रू वर मात कराल.
बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. मन आनंदी राहण्याचा उद्याचा दिवस आहे.
प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. उत्साह, उमेद वाढवणारा उद्याचा दिवस आहे. घरी पाहुण्यांचे आगमन होईल.
व्यवसायात वाढ होईल. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधून पुढे जाल. जवळच्या प्रवासाच्या दृष्टीने दिवस चांगला आहे.
मनोबल आणि आत्मविश्वास वाढता राहील. दिवसाचे गमक साधणार आहे. मन आनंदी राहील.
कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा उद्या करू नका. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे केलेली जास्त बरे आहे.
अनेकांच्या सहकार्याने पुढे जाल. महत्त्वाच्या गाठीभेटी सुद्धा पार पडतील. जवळच्या व्यक्तींबरोबर ऊठबस झाल्यामुळे समाधानाची लहर येईल.
उद्या आपले मनोबल चांगले राहणार आहे. तुम्ही घेतलेले निर्णय आणि अंदाज अचूक ठरतील.
तुमच्या कर्तुत्वाला नवनवीन संधी लाभतील. वरिष्ठांच्या सहकार्याने पुढे जाण्याचे योग आहेत.
उद्याच्या खर्चाचं प्रमाण अधिक राहील. आर्थिक निर्णय शक्यतो करु नये.