Haldi Dance Video Saam TV
व्हायरल न्यूज

Haldi Dance Video: मागणी पळवून लावण्यासाठी वरातीत करवलीचा धिंगाणा; डान्स पाहून पाहुणे टकमक पाहतच राहिले

Haldi dance video viral: डान्स पाहण्यासाठी वरातीत आलेल्या साऱ्यांनीच गर्दी केलीय. बेभान होऊन नाचणाऱ्या या मुलीचा व्हिडिओ आता जोरदार व्हायरल होतोय.

Ruchika Jadhav

Karavali Dance Video Viral:

सोशल मीडियावर नेहमीच लग्न, त्यातील गमतीजमती आणि डान्सचे व्हिडिओ व्हायरल होतात. हे व्हिडिओ पाहून अनेक जण आपणही आपल्या लग्नात असंच काही भन्नाट करायचं असं काही जण ठरवतात. सध्याच्या काळात सगळीकडेच जोरदार हळदीचा धिंगाणा असतो. अशात एका हळदी कार्यक्रमातील करवलीच्या डान्सचा व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरुणी गोरी गौरी मांडवाखाली या गाण्यावर भन्नाट डान्स करत आहे. तिचा डान्स पाहण्यासाठी वरातीत आलेल्या साऱ्यांनीच गर्दी केलीय. बेभान होऊन नाचणाऱ्या या मुलीचा व्हिडिओ आता जोरदार व्हायरल होतोय.

लग्न (Wedding) सोहळ्यात सर्वच व्यक्ती नाचून आनंदाने प्रत्येक क्षण एंजॉय करतात. पिवळी साडी नेसून तरुणीने केलेल्या या डान्सवर अनेक कमेंट्स आल्यात. तसेच व्हिडिओ पोस्ट करत यावर कॅपशनमध्ये लिहिलंय की, घरातल्या लग्नात असा डान्स करायचा की आलेली चार पाच मागणी डान्स पाहूनच निघून जातील.

आजकालच्या सर्वच मुली शिक्षण आणि नोकरी याकडे जास्त लक्ष देतात. लग्नात घरातल्या मुली सुंदर नटल्यावर लग्नासाठी आलेली अनेक पाहुणे मंडळी त्यांना लग्नासाठी मागणी घालतात. अशात अशी आलेली मागणी पळवून लावायची असतील तर असा डान्स करावा असा गमतीशीर मेसेज या व्हिडीओतून देण्यात आलाय.

@maharashtra chya muli या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ (Video) पोस्ट करण्यात आला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला लाखोंच्या घरात लाइक्स आलेत. दिलेलं कॅप्शन खरंच आहे असं एकाने कमेंटमध्ये म्हटलंय. तर आणखीन एकाने तरुणीचा खत्री डान्स पाहून तिच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

Priyanka Gandhi : वायनाड पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा दणदणीत विजय; मोकेरी यांना 4 लाखांच्या फरकाने हरवलं

Uddhav Thackeray : लाटेपेक्षा त्सुनामी आली; महायुतीच्या विजयावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: महिला असुरक्षित,बेकारी वाढतेय- उद्धव ठाकरे

Mental Health: मानसिक आरोग्य संतुलित ठेवण्यासाठी 'या' गोष्टींचा करा आहारात समावेश

Health: शरीरासाठी आवश्यक पदार्थ कोणकोणते? जाणून घ्या एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT