सध्या दक्षिण भारतातील राज्यात मिचॉन्ग चक्रिवादळाचा कहर सुरू आहे. जोरदार पावसामुळे सर्व जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेकांचे सुखी संसार अर्धात मोडलेत. तेथील भयानक परिस्थितीचे अनेक व्हिडिओ आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहिलेत. सध्या सोशल मीडियावर त्याच राज्यातील भयानक परिस्थितीमधून एक गमतीदार व्हिडिओ व्हायरल होतोय.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
व्हायरल व्हिडिओहा सोशल प्लॅटफॉर्म एक्सवरील @Learnedpolitics या पेजवरून पोस्ट करण्यात आला आहे. व्हायरल व्हिडिओहा चैन्नई शहरातील आहे. रस्त्यावरून जाणाऱ्या गाडीतील एका प्रवासाने त्याच्याकडील मोबाईमध्ये मासे पकडणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ कैद केलाय. शक्यतो असे वाटते की पुराच्या जोरदार पाण्यातून वाहत मासा भर रस्त्यात आला असेल किंवा रस्त्यावरून जाणाऱ्या मास्यांनी भरलेल्या ट्रकमधूनहा मासा पडलेला असावा.
व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, रस्त्यावरील काळ्या रंगाच्या रेनकोटमध्ये एक व्यक्ती आपल्याला दिसत आहे. सोबतच जोरदाप पाऊसही सुरु आहे. तो व्यक्ती त्याच्या हातात मोठा मासा पकडून चाला आहे.
यादरम्यान मासा हातातून निसटनू रस्त्यावर असलेल्या पाण्यात पडतो. तो व्यक्ती खाली पडलेला मासा पकडण्याचा प्रयत्न करत असतो. परंतू मासा जीवंत असून तडफडत असल्याने त्या व्यक्तीला मासा पकडण्यात यश मिळत नाही. परत एकदा त्याच्या हातातून मासा खाली पडतो. यामुळे व्यक्ती वैतागलेला दिसतोय. व्हिडिओत शेवटी तो वैतागून मासा पकडतोच आणि तेथून मासा घेऊन निघून जातो.
चैन्नईतील या व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया येत आहेत. व्हिडिओला आतापर्यंत ४ लाखांहून अधितचे व्ह्यूज मिळालेत. तसंच साधारण पाच हजार लोकांनी व्हिडिओला लाईक केले आहे. या व्हिडिओच्या कमेंट्स बॉक्समध्ये यूजर्संनी मासे पकडणाऱ्या व्यक्तीबद्दल भन्नाट अशा कमेंटस् केल्या आहेत. तर काहींनी परिस्थिती काय आहे? हा काय करतोय.. अशा शब्दात रागही व्यक्त केलाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.