Chai Wala Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Chai Wala Viral Video: चहावाल्या आप्पाचा विषय हार्ड, दुकानदारीसाठी लढवली जबरदस्त शक्कल; सर्वत्र होत आहे कौतुक

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सध्या प्रत्येक व्यक्ती बिजनेस करण्याकडे वळताना दिसून येत आहे. बिजनेस सुरु करण्यासाठी नवीन नवीन प्रयोग मार्केटमध्ये होताना दिसून येतात. बिजनेस करणारे अनेक लहान विक्रेते आणि मोठे विक्रेते जबरदस्त आयडिया लावतात. सोशल मीडियावर आपल्याला यासंबंधित अनेक अनोखे व्हिडिओ पाहण्यास मिळतात. अहमदनगरमधील सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. जिथे एका चहा विक्रेत्याने चहाचा छोटूसा बिजनेस जबरदस्त चालण्यासाठी अनोखा जुगाड केलेला आहे. सोशल मीडियावर सध्या या व्हिडिओची मोठी चर्चा होत आहे.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला एक चहाचा स्टॉल दिसत आहे. या स्टॉलच्या बाजूला काही व्यक्ती आहेत जे चहा(Tea) पिण्यासाठी थांबलेले आहेत. शिवाय या चहावाल्या काकांकडे काही खाद्य पदार्थही आहेत जे घेण्यासाठी थांबलेले आहेत. व्हिडिओ तुम्ही पाहिले तर चहाच्या स्टॉलकडे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी काकांनी जबरदस्त जुगाड(Jugad) वापरलेला आहे, जो तुम्हाला व्हायरल व्हिडिओत दिसेल. या चहाचा जो स्टॉल आहे जो एका हातगाडीवर आहे. या स्टॉलवर काकांनी एक इलेक्ट्रिक(Electric) बॅनर लावलेले आहे, ज्यावर ''अप्पांचा विषय लेय हार्ड आहे'' या गाण्याच्या ओळी दिसून येत आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट मात्र तो इन्स्टाग्रामवरील ''@ahmednagar_trends'' या अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट करत,''नगरकरांचा नादच खुळा,असा जबरदस्त ट्रेंड दुसरीकडं कुठंच दिसणार नाही'' असे कॅप्शन लिहिण्यात आलेले आहे. व्हिडिओ एक दिवसांपूर्वीच शेअर करण्यात आलेला असून व्हिडिओला ८ हजारहून अधिक नेटकऱ्यांनी पसंती दिलेली आहे.

प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ अहमदनगरमधील असल्याचे समजते. व्हिडिओ पाहिल्यानंतर मोठ्या प्रमाणात ट्रेंडिगवर आहे. एवढेच नाही तर अनेक प्रतिक्रिया व्हिडिओ पाहिल्यानंतर आलेल्या आहेत. एका यूजरने प्रतिक्रिया केलेली आहे की,'आपल favourite'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,'' कडकच'' तर अनेक यूजर्संनी सुंदर, मस्तच असे इमोजी कमेट्स बॉक्समध्ये दिलेले आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss Marathi: 'बिग बॉस'ने घेतली अभिजीत अन् निक्कीची फिरकी

Abhijeet Sawant Wife: बिग बॉस मराठीमधील अभिजीत सांवतची पत्नी काय काम करते? तुम्हाला माहितीये का?

Maharashtra Politics: छ. संभाजीनगरमध्ये महायुतीचं टेन्शन वाढणार, अजित पवारांच्या शिलेदाराने भाजपविरोधात केलं बंड!

Maharashtra News Live Updates : माढ्यात मोठी घडामोड! बबनराव शिंदे यांच्या विरोधात पुतण्याचे बंड

Masai Pathar Tourism : फुलांची चादर घेऊन सजलं कोल्हापुरातील मसाई पठार; नजारा पाहून डोळे दिपतील

SCROLL FOR NEXT