Raj Thackeray addressing the crowd during the “Truth March” in Mumbai alongside Uddhav Thackeray, demanding clean and transparent voter lists. Saam Tv
Video

Satyacha Morcha : आधी नावं वाचली, नंतर माणसं उभी केली; सत्याच्या मोर्चात राज ठाकरे यांचा तुफान हल्ला, VIDEO

Raj Thackeray Speech On Fake And Duplicate Voters: राज ठाकरे यांनी मुंबईतील सत्याच्या मोर्चात निवडणूक आयोगावर तुफान हल्ला चढवला. मतदार याद्यांमधील दुबार नावे हटवून पारदर्शक यादी तयार करा, अशी मागणी त्यांनी केली.

Omkar Sonawane

मतदारयाद्यांमधील घोळ आणि कथित मतचोरीचा आरोप करत विरोधकांनी आज, शनिवारी निवडणूक आयोगाविरोधात सत्याचा मोर्चा काढला. या मोर्चात मनसे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष या प्रमुख राजकीय पक्षांसह महाविकास आघाडीतील इतर पक्षही सहभागी झाले होते.

विरोधकांच्या या सत्याच्या मोर्चाला चर्चगेटपासून सुरूवात झाली. त्याचं नेतृत्व मनसे प्रमुख राज ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं. त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून ज्येष्ठ नेते शरद पवार, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील, शेकापचे जयंत पाटील, विजय वडेट्टीवार, सुप्रिया सुळे यांच्यासह इतर प्रमुख नेते मोर्चाच्या स्थळी पोहोचले. सकाळपासूनच चर्चगेट परिसरात मनसे, शिवसेना आणि महाविकास आघाडीतील घटकपक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने पोहोचले होते.

या सभेमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर जोरदार हल्ला चढवला. सगळे बोलत आहेत दुबार मतदार आहेत. आम्ही बोलतोय, भाजपचे लोक बोलतात. अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधील लोक बोलताहेत. मग निवडणुका घेण्याची घाई का, असा सवाल राज ठाकरे यांनी केला. मतदार याद्या साफ करा, पारदर्शक याद्या केल्यावर यश-अपयश कोणाचे हे स्पष्ट होईल, असे राज ठाकरे म्हणाले. तसेच राज ठाकरे यांनी भर सभेत दुबार मतदारांचा पुरावा देखील दाखवला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganesh Kale Case : पुण्यात पुन्हा गँगवार! गणेश काळेवर गोळ्या झाडतानाचा CTTV व्हिडिओ समोर

माजी मंत्र्यांच्या नातवाचा पाय खोलात; भाजप नेत्याकडून पैसे थकवल्याचा गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?

Maharashtra Live News Update: कार्तिकीच्या निमित्ताने चंद्रभागा स्नानासाठी भाविकांची मोठी गर्दी

Satara Tourism : कास पठाराजवळ लपलाय निसर्गाचा अद्भुत नजारा, थंडीत येथे आवर्जून जा

Crime News: बायकोसोबत अवैध संबंधाचा संशय, नवऱ्याने केली तरुणाची गळा चिरून हत्या

SCROLL FOR NEXT