Maharashtra Congress CEC meeting saam tv
Video

Maharashtra Election : मविआच्या समन्वयाची बाळासाहेबांकडे जबाबदारी, अडीच तास चाललेल्या CEC बैठकीत काय चर्चा झाली? VIDEO

MVA Seat Sharing : महाविकास आघाडीच्या समन्वयाची जबाबदारी काँग्रेसने बाळासाहेब थोरात यांच्याकडे सोपवली आहे. थोरात आता उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याशी चर्चा करतील, असे सांगण्यात आले आहे.

Pramod Subhash Jagtap

Maharashtra Vidhan Sabha Election : महाराष्ट्र काँग्रेसच्या सीईसीची बैठक दिल्लीत झाली. जवळपास अडीच तास या बैठकीत चर्चा झाली. या बैठकीनंतर राज्यातील नेते नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. आजची बैठक व्यवस्थित पार पडली. अनेक नावांवर शिक्कामोर्तब झालं आहे. एक-दोन दिवसांत ही नावे जाहीर होतील, असे थोरात यांनी सांगितले. तर आणखी एक सीईसीची बैठक होईल, त्यात उर्वरित नावे अंतिम होतील, असेही ते म्हणाले.

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मला उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याशी चर्चा करण्यास सांगितले आहे. उद्या मी त्यांच्यासोबत चर्चा करणार आहे, असेही थोरात यांनी सांगितले. तिढा म्हणता येणार नाही. चर्चा होणार आहे. त्यातून मार्ग निघेल. उद्या दुपारी आम्ही महाविकास आघाडीचे नेते पुन्हा चर्चेला बसणार आहोत, अशी माहिती थोरात यांनी दिली.

नाना पटोले काय म्हणाले?

आजच्या बैठकीत काही नावांवर चर्चा झाली. उद्या आमचे नेते शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करतील. बाळासाहेब थोरात या दोन्ही नेत्यांसोबत बोलतील. २५ तारखेला पुन्हा सीईसी बैठक होईल, अशी माहिती पटोले यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tourist Spots: भारतातील सर्वाधिक भेट दिलेले 'ही' ५ पर्यटन स्थळ

Devendra Fadanvis : महाराष्ट्राने पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींवर विश्वास दाखवलाय; अभूतपूर्व विजयानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया

Priyanka Gandhi : वायनाड पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा दणदणीत विजय; मोकेरी यांना 4 लाखांच्या फरकाने हरवलं

Uddhav Thackeray : लाटेपेक्षा त्सुनामी आली; महायुतीच्या विजयावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: महिला असुरक्षित,बेकारी वाढतेय- उद्धव ठाकरे

SCROLL FOR NEXT