राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल आज लागला आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीला जनतेनी पसंती दिल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे. तर महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. अशातच लातूर ग्रामीणमध्ये धीरज देशमुख यांचा देखील पराभव झाला आहे. लातूर ग्रामीणमधून भाजपचे रमेश कराड हे विजयी झाले आहेत. लातूर ग्रामीणमध्ये अत्यंत चुरशीची लढत झाली होती. राष्ट्रवादीचे धीरज देशमुख यांच्यासाठी अभिनेता रितेश देशमुख सुद्धा मैदानात उतरले होते. ते देखील धीरज देशमुख यांच्यासाठी प्रचार करत होते. लातूर ग्रामीणला राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र असं असतानाही काँग्रेसची जादू लातूरमध्ये चाललेली नसल्याचं स्पष्ट झालं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.