कोट्यवधी भारतीयांसाठी २२ जानेवारी हा दिवस ऐतिहासिक असणार आहे. कारण याच दिवशी अयोध्येतील राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला दुपारी १२:२० वाजता सुरुवात होणार आहे. (Ram Mandir Pran Pratishtha)
या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अनेक राजकीय मंडळींससह, बॉलीवूड स्टार्स आणि दिग्गज क्रिकेटपटू देखील हजेरी लावणार आहेत. दरम्यान कोण आहेत ते क्रिकेटपटू? जाणून घ्या.
विराट कोहली ..
भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने (Virat Kohli) आतापर्यंत भारतीय संघाला अनेक महत्वाच्या सामन्यांमध्ये विजय मिळवून दिला आहे. काही दिवसांपूर्वीच विराट आणि अनुष्काचा एक फोटो व्हायरल झाला होता.
ज्यात दोघेही प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची आमंत्रण पत्रिका स्वीकारताना दिसून आले होते. विराट या सोहळ्यासाठी अयोध्येला पोहोचल्याची माहिती समोर आली आहे. विराटसह अनुष्का शर्मा देखील उपस्थित राहणार आहे.
सचिन तेंडुलकर
भारतीय संघाचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० शतकं झळकावत इतिहास रचला होता. तो देखील या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी अयोध्येत हजेरी लावणार आहे. (Latest sports updates)
एमएस धोनी..
भारतीय संघाला टी -२० वर्ल्डकप २००७, वनडे वर्ल्डकप २०११ आणि चॅम्पियन्स ट्रॉफी २०१३ स्पर्धा जिंकून देणारा एमएस धोनी (MS Dhoni) देखील या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहे. धोनीला देखील हा कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आलं आहे.
सुनील गावसकर..
भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर देखील अयोध्येत हजेरी लावू शकतात. सुनील गावसकर हे भारताचे दिग्गज फलंदाज आहेत. त्यांच्या नावे कसोटी क्रिकेटमध्ये १० हजारांहून अधिक धावा करण्याची नोंद आहे.
सौरव गांगुली
भारताचे माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली देखील या सोहळ्याला हजेरी लावू शकतात.यासह रोहित शर्मा, वीरेंद्र सेहवाग, रविंद्र जडेजा, आर अश्विन, राहुल द्रविड़, कपिल देव, हरभजन सिंग आणि गौतम गंभीर यांनाही आमंत्रण मिळाल्याची माहिती समोर आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.