देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ झाला आहे. स्पर्धेतील पहिलाच दिवस जोरदार चर्चेत राहिला. मुंबई आणि पटना या दोन्ही संघांमध्ये सामना होणार होता. या सामन्यासाठी मुंबईचा संघ मोइन- उल-हक स्टेडियममध्ये दाखल झाला.
मात्र मुंबईला आव्हान देण्यासाठी बिहारचा एक नव्हे तर दोन संघ मैदानावर आले. हे ऐकायला जरी विचित्र वाटत असलं,तरी असं घडलं आहे. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, बिहार क्रिकेट असोसिएशनच्या दोन गटातील वाद आता मैदानावर येऊन पोहोचला आहे. नेमकं काय झालं? जाणून घ्या.
तर झाले असे की,मुंबईविरुद्धचा सामना खेळण्यासाठी बिहारचे दोन संघ मैदानावर दाखल झाले. पहिला संघाची निवड बीसीए अध्यक्ष राकेश तिवारी यांनी निवडली होती. तर दुसरा संघ सचिव अमित कुमार यांनी निवडला होता. आश्चर्यचकीत करणारी बाब म्हणजे, दोन्ही संघांमध्ये असा एकही खेळाडू नव्हता, ज्या खेळाडूचं नाव दोन्ही संघात असेल.
बीसीए अध्यक्ष राकेश तिवारी यांनी म्हटले की,'आम्ही क्षमता पाहुन संघाची निवड केली आहे. आम्ही निवडलेला संघ योग्य आहे. आमच्याकडे एक क्रिकेटपटू आहे (साकिब हुसैन) ज्याची आयपीएल स्पर्धेत निवड झाली आहे. आमच्याकडे १२ वर्षीय टॅलेंटेड खेळाडू आहे.' (Latest sports updates)
तसेच बीसीएचे सचिव अमित तिवारी म्हणाले की, 'सर्वात पहिली गोष्ट म्हणजे मी निवडणूक जिंकलो आहे. मी बीसीएचा अधिकृत सचिव आहे. तुम्ही एका सचिवला निलंबित करु शकत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे अध्यक्ष संघाची निवड कशी करु शकतो? तुम्ही कधी बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी यांना संघाची घोषणा करताना पाहिलं आहे का? तुम्ही नेहमीच पाहिलं असेल की, जय शाहची स्वाक्षरी असते.
रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी बीसीसीआये आपल्या प्रेस रिलीजमध्ये म्हटले की,'निलंबित करण्यात आलेल्या सचिव अमित यांच्यावर खोटा संघ निवडल्याबद्दल आणि गेटवर हल्ला केल्याबद्दल कारवाई केली आहे. तसेच त्यांनी मनोज कुमार यांच्यावर जिवघेणा हल्ला ही केला होता. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.