gujarat titans yandex
क्रीडा

IPL 2025 Rules: चुकीला माफी नाही..IPL मध्ये ही चूक केल्यास थेट 2 वर्षांचा बॅन

Ankush Dhavre

IPL 2025 Rules: आयपीएल गव्हर्निंग कमिटीने आयपीएल २०२५ स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत काही महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. तसेच काही नियमांमध्ये मोठे बदल देखील करण्यात आले आहेत. आयपीएलच्या अधिकृत सांकेतिक स्थळावर ८ नियमांचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यापैकीच एक नियम म्हणजे, आयपीएलमध्ये निवड झाल्यानंतर माघार घेणाऱ्या खेळाडूंवर आता बीसीसीआय ॲक्शन घेणार आहे.

आयपीएल स्पर्धेत काही असे खेळाडू आहेत, जे एकदा बोली लागल्यानंतर काहीतरी कारण देऊन स्पर्धेतून माघार घेतात. मात्र अशा खेळाडूंवर आता बीसीसीआय ॲक्शन घेण्याच्या तयारीत आहे. गेल्या हंगामात लखनऊ सुपर जायंट्स संघाने इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वूडला ७.५० कोटी मोजत आपल्या संघात स्थान दिले होते. मात्र त्याने वर्कलोड मॅनेजमेंटचं कारण देत स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला होता.

काय आहे नियम?

या नियमानुसार, एखाद्या खेळाडूने आयपीएलमध्ये नाव नोंदवलं आणि तो सिलेक्ट झाला आणि त्यानंतर तो जर उपलब्ध राहणार नसेल. तर त्याच्यावर कारवाई केली जाईल. त्याला पुढील २ हंगामात खेळता येणार नाही.

मेगा ऑक्शनमध्ये नाव नोंदणी करणं गरजेचं

आयपीएलच्या गव्हर्निंग कमिटीने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. या नियमानुसार, परदेशी खेळाडूंनी मेगा ऑक्शनमध्ये नाव नोंदणी करणं गरजेचं असणार आहे. ज्या खेळाडूंनी मेगा ऑक्शनमध्ये आपलं नाव नोंदवलं आहे. अशाच खेळाडूंना प्लेअर ऑक्शनमध्ये सहभाग घेता येईल.

खेळाडूंसाठी केली मोठी घोषणा

जय शहा यांनी आयपीएल खेळाडूंसाठी मोठी घोषणा केली आहे. या स्पर्धेत खेळण्यासाठी खेळाडूंना कोट्यवधी रुपये मिळतात. मात्र आता खेळाडूंच्या रकमेत वाढ होणार आहे. आयपीएलमध्ये आता प्रत्येक सामना खेळण्यासाठी खेळाडूंना मॅच फी दिली जाणार आहे. प्रत्येक सामन्यासाठी खेळाडूंना ७ लाख रुपये मॅच फी म्हणून दिले जाणार आहेत. दरम्यान सर्व सामने खेळणाऱ्या खेळाडूंना १ कोटींहून अधिक रक्कम दिली जाईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Live Updates : अजित पवारांचे कट्टर समर्थक मोहोळचे माजी आमदार राजन पाटील विजयसिंह मोहिते पाटील यांच्या भेटीला

Maharashtra Politics : झालं 'कल्याण'! निवडणुका जाहीर होण्याआधीच भाजप-शिवसेनेत तणाव, अरविंद मोरे यांचा भाजपला इशारा

Overcome Laziness: शरीरातील आळस दूर करण्यासाठी 'या' सोप्या टिप्स करा फॅालो

Belapur Crime : पोलीस पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल; बचत गटाच्या नावाने पैसे घेत केली फसवणूक

अंतराळात दिसली रहस्यमयी वस्तू; शास्त्रज्ञंही झाले हैराण

SCROLL FOR NEXT