आयपीएल २०२५ स्पर्धा सुरू व्हायला अवघे काही महिने शिल्लक राहिले आहेत. या स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी येत्या डिसेंबर महिन्यात मेगा ऑक्शनचा थरार रंगणार आहे. दरम्यान या मेगा ऑक्शनच्या पार्श्वभूमीवर आयपीएल गव्हर्निंग कमिटीने काही नव्या नियमांची घोषणा केली आहे. ज्यात अन्कॅप्ड खेळाडूच्या नियमाची चर्चा सुरू आहे.
या नियमानुसर एमएस धोनी आगामी हंगामात अन्कॅप्ड खेळाडू म्हणून खेळू शकतो. असं म्हटलं जात आहे. एकटा धोनी नव्हे तर आगामी हंगामात अन्कॅप्ड खेळाडू म्हणून खेळताना दिसून येऊ शकतात.
भारतीय संघासाठी आयसीसी वनडे वर्ल्डकप २०१९ स्पर्धा खेळणारा विजय शंकर देखील अन्कॅप्ड खेळाडू म्हणून खेळू शकतो. आयपीएल २०२४ स्पर्धेत तो गुजरात टायटन्सकडून खेळताना दिसून आला होता.
भारतीय संघातील मध्यमगती वेगवान गोलंदाज मोहित शर्मा २०१५ मध्ये भारतीय संघासाठी आपला शेवटचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. त्यानंतर त्याला भारतीय संघासाठी खेळण्याची संधी मिळालेली नाही.
भारताचा अनुभवी फिरकी गोलंदाज अमित मिश्रा २०१७ मध्ये शेवटचा सामना खेळला होता. गेल्या हंगामात तो लखनऊ सुपर जायंट्स संघाकडून खेळण्यासाठी उतरला होता. यावेळी तो अन्कॅप्ड खेळाडू म्हणून खेळताना दिसून येऊ शकतो.
संदीप शर्मालाही भारतीय संघासाठी फार सामने खेळण्याची संधी मिळाली नाही. तो २०१५ मध्ये भारतीय संघासाठी शेवटचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. त्यामुळे तो अन्कॅप्ड खेळाडू म्हणून आगामी आयपीएल हंगामात खेळताना दिसून येऊ शकतो.
पीयूष चावला हा भारतीय संघातील अनुभवी फिरकी गोलंदाज आहे. त्याला भारतीय संघांसाठी तिन्ही फॉरमॅट खेळण्याची संधी मिळाली आहे. २०१२ मध्ये तो भारतीय संघासाठी शेवटचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. त्यानंतर त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळालेली नाही. त्यामुळे तो आगामी हंगामात अन्कॅप्ड खेळाडू म्हणून खेळताना दिसून येऊ शकतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.