Jasprit Bumrah  Saam Tv
Sports

IPL 2025: जसप्रीत बुमराहच्या पुनरागमनाबाबत मोठी अपडेट; मुंबई संघात कधी होणार कमबॅक?

Jasprit Bumrah : आयपीएल सुरू होऊन एक आठवडा झालाय. मात्र जसप्रीत बुमराहच्या पुनरागमनबाबत कोणतीच माहिती समोर आली नाहीये. बुमराहबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे.

Bharat Jadhav

IPL 2025 दरम्यान मोठी बातमी समोर आलीय. यामुळे मुंबई इंडियन्सचा तणाव वाढू शकतो. भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचं पुनरागमन लांबण्याची शक्यता. बुमराहचं कमबॅक लांबल्यामुळे मुंबईचं टेन्शन वाढणार आहे. आधी बुमराह मार्च महिन्यातील आयपीएलचे तीन सामन्यांसाठी गमावणार असं वाटत होतं. परंतु आता हाती आलेल्या माहितीनसुार, बुमराहच्या पुनरागमनासाठी आणखी काही काळ लागू शकतो. बुमराह अजून एक आठवडा मैदानात उतरणार नाही, असं सांगितलं जात आहे.

बुमराहशिवाय आकाश दीपच्या पुनरागमनालाही वेळ लागू शकतो. आकाश दीप पुढील आठवड्यापर्यंत परतेल, अशी शक्यता आहे. भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून दोन्ही खेळाडूंनी कोणत्याही प्रकारचे सामने खेळलेले नाहीत. यावर्षी जानेवारीत सिडनी कसोटीच्या मध्यंतरी बुमराहला दुखापत झाली होती, तेव्हापासून तो मैदानापासून दूर आहे. मुंबईच्या संघाला ज्याप्रमाणे बुमराहची प्रतिक्षा त्याचप्रमाणे लखनऊ सुपर जायंट्स (एलएसजी) आकाश दीपच्या पुनरागमनाची आतुरतेने वाट पाहत आहे.

कारण सध्या त्यांचे गोलंदाजी आक्रमक नाहीये. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, बीसीसीआय वैद्यकीय टीम बुमराहची अत्यंत काळजी घेत आहे, कारण भारताला आयपीएलनंतर लगेचच जूनमध्ये इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. बीसीसीआयच्या सूत्राने सांगितले की, बुमराहची दुखापत गंभीर आहे. बुमराहला तणावग्रस्त फ्रॅक्चर होऊ नये, यासाठी वैद्यकीय पथक काळजी घेत आहेत.

बुमराहही खबरदारी घेत आहे. तो सेंटर ऑफ एक्सलन्स (CoE) येथे गोलंदाजी करत आहे, परंतु त्याला पूर्ण पुनरागमन करण्यासाठी आणखी वेळ लागू शकतो का नाही हे अद्याप कोणतीही विशिष्ट टाइमलाइन सेट नाहीये. परंतु एप्रिलच्या मध्यापर्यंत तो पुनरागमन करेल अशी अपेक्षा आहे. आकाश दीप देखील 10 एप्रिलपर्यंत परतण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Couple Romance Viral video : आता याला काय म्हणावं? गर्लफ्रेंडने डोके मांडीवर ठेवले अन्...; उडत्या विमानात कपलचा रोमान्स, व्हिडिओ व्हायरल

Manikrao Kokate: शेतकरी मरतोय आणि मंत्री खेळतोय रमी; कोकाटेंच्या 'रमी' डावावरून खळबळ

Pune Accident : पुण्यात हिट अँड रनचा थरार! भरधाव कारची दुचाकीला धडक; मुलाचा मृत्यू, आईची प्रकृती गंभीर

Latur Clash : शेतकऱ्यांच्या पोरांवर हल्ला,किंमत मोजावी लागेल; अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांच्या हल्ल्यानंतर छावा संघटना आक्रमक

Ice Massage On Face: बर्फाने चेहऱ्यावर मसाज केल्याने कोणते फायदे होतात? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT