सर्वांनाच माहितेय लग्नसोहळ्यात डान्स करण्याची एक वेगळीच क्रेझ असते. स्टेजवर डीजे सुरु झाला की, लहानांपासून थोरांपर्यंत डान्स फ्लोअरवर धाव घेतात. पण अनेकदा आपण पाहतो की, काही माणसांचा अतिउत्साह त्यांच्याच अंगलट येतो.अशाच प्रकारचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. (couple dance video viral on social media
हा व्हिडिओ पाहून नेटकरी लोटपोट हसतील, यात काही शंका नाही. स्टेजवर पत्नी डान्स करत असताना पतीनं तिला उचलण्याचा प्रयत्न केला आणि तिथेच सगळा घोळ झाला. तेरे बीन नही लगदा दील मेरा ढोलना या गाण्यावर (dance video) एक महिला जबरदस्त ठुमके मारत होती. पण त्याचेवेळी अतिउत्साही पतीला त्याच्या पत्नीला उचलण्याचा मोह आवरला नाही आणि लागलीच हे जोडपं स्टेजवर डोक्यावरच पडलं. हे दृष्य पाहून सर्वच पोट धरून हसू लागले.
इथं पाहा व्हिडिओ
डान्स फ्लोअर वर काही कपल्स मजेशीर डान्स करत असतात. तेरे बीन नही लगदा दील मेरा ढोलना या गाण्यावर ही जोडपी थिरकत असतात. त्यानंतर अचानक एका पतीनं रोमॅन्टिक होऊन पत्नीला उचलण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा हा प्रयत्न सपशेल फेल झाला.दोघंही पती-पत्नी तोल गेल्यानं स्टेजवर डोक्यावरच पडतात. पत्नीला उचलण्यात पतीला अपयश येतं. हे दृष्य पाहून लोकांना हसू आवरत नाही.
विशेष म्हणजे स्टेजवर पडल्यानंतरही खुद्द या जोडप्याला हसू आवरलं नाही. या व्हिडिओला @hasnazaroorihain या अकाऊंटद्वारे शेअर करण्यात आलं आहे. या व्हिडिओला पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला. एका युजरनं म्हटलं, हे दृष्य खरंच खूपच मजेशीर आहे. तर दुसऱ्या युजरनं म्हटलं, गरजेपेक्षा जास्त प्रेम करण्यांची अशीच अवस्था होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.