Heavy Snowfall In Kashmi Google
देश विदेश

Heavy Snowfall: काश्मीर गोठवलं! तुफान बर्फवृष्टी, विमान उड्डाण, रेल्वे रद्द; जम्मू-श्रीनगर हायवे ठप्प

Heavy Snowfall In Kashmir: जोरदार बर्फवृष्टीमुळे काश्मीरमधील सामान्य जीवनावर परिणाम झाला असून वाहतूक बंद पडलीय. जम्मू-श्रीनगर महामार्ग आणि रेल्वे सेवा ठप्प आहेत.

Bharat Jadhav

काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी सुरू असल्याने सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. श्रीनगर आणि खोऱ्यातील इतर सपाट भागात हंगामातील पहिला हिमवर्षाव झाला. काश्मीरमधील सर्व प्रकारच्या वाहतुकीवर मोठा परिणाम झाला वाहतूक बंद पडलीय. कडाक्याच्या 'चिल्लई-कलन' हिवाळ्याच्या काळात प्रदेशातील वीजपुरवठा खंडित झालाय.

दरम्यान रस्ता वाहतुकीसाठी महामार्गावरील बर्फ दूर केला जात आहे. दक्षिण काश्मीर आणि मध्य काश्मीरच्या मैदानी भागात मध्यम ते जोरदार हिमवृष्टीची नोंद झाली. श्रीनगरमध्ये सुमारे ८ इंच बर्फाची नोंद झालीय, तर गांदरबल आणि सोनमर्गमध्ये ७-८ इंच बर्फवृष्टी झालीय. श्रीनगर-लेह महामार्गावरील झोजिला अक्षावर १५ इंच बर्फ कोसळला. तर अनंतनाग जिल्ह्यातील भागात १७ इंच बर्फ पडला.

पहलगाम, पुलवामा, शोपियान आणि इतर भागातही मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाल्यामुळे तेथील वाहतुकीवर परिणाम झालाय. जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग हिमवृष्टीमुळे बंद करण्यात आलाय. महामार्ग सुरळीत करण्यासाठी मार्गावरील बर्फ बाजुला केला जात आहे. बनिहाल-बारामुल्ला सेक्शनवरील रेल्वे सेवादेखील रद्द करण्यात आलीय.

हिमवृष्टीमुळे श्रीनगर येथील हवाई वाहतुकीवरही मोठ्या प्रमाणात प्रभावित झालीय. शनिवारी सुमारे ८० टक्के उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. काश्मीर खोऱ्यातील अनेक भागातील वीज पुरवठा खंडीत झालाय.जलवाहिन्यांमध्ये बर्फ साठल्याने श्रीनगर शहरातील काही भागांत पाणी पुरवठा झाला नाही. शुक्रवारी श्रीनगरमध्ये उणे ७.३ तापमानाची नोंद झाली होती.दरम्यान मुख्यमंत्री ओमर अब्दुला यांनी वीज पुरवठा पुन्हा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू असून लवकर ते सुरळीत होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भयंकर! चिमुकलीवर चालता चालता अचानक भटक्या कुत्र्यांचा हल्ला; VIDEO पाहून हादरुन जाल

Son Of Sardaar 2 Release Date : अजय देवगणच्या 'सन ऑफ सरदार २'ची तारीख बदलली, 'या' चित्रपटासोबत होणार कांटे की टक्कर

Maharashtra Live News Update: पुणे शहराचा पाणी पुरवठा आज विस्कळीत

Horoscope Sunday Update : दवाखाने मागे लागतील, विनाकारण खर्च होईल, वाचा आजचे राशीभविष्य

Maharashtra Politics : आदित्य ठाकरे -फडणवीस भेट ही अफवा... स्वतः मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलं, वाचा

SCROLL FOR NEXT