Police investigation at the Bilaspur residence where the victim’s dismembered body was recovered from a water tank. saam tv
देश विदेश

पत्नीची निर्घृण हत्या केली, मृतदेहाचे ५ तुकडे पाण्याच्या टाकीत फेकले; पतीच्या भयानक कृत्यानं खळबळ

Husband Kills Wife Over Suspicion In Bilaspur Case Details: छत्तीसगडच्या बिलासपूरमध्ये पत्नीची हत्या करून मृतदेहाचे पाच तुकडे करून पाण्याच्या टाकीत लपवणाऱ्या पतीला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

Omkar Sonawane

छत्तीसगढच्या बिलासपुरमध्ये एक हादरवून टाकणाऱ्या हत्याकांडावर कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे.अनैतिक संबंधांच्या संशयावरून आपल्या पत्नीची हत्या करून तिच्या शरीराचे तुकडे करून ते पाण्याच्या टाकीत लपवून ठेवल्या प्रकरणी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तसेच या आरोपीकडे नोटा छापण्याची मशीन देखील सापडले होते. त्यामुळे न्यायालयाने त्याला विविध कलमाखाली शिक्षा सुनावली.

ही संपूर्ण घटना २ मार्च २०२३ रोजीची आहे, जेव्हा गुन्हे विरोधी पथकाला उसलापूरच्या गीतांजली कॉलनी, फेज १ मध्ये बनावट चलन छापले जात असल्याची माहिती मिळाली. त्यावेळी पोलीस आरोपी पवन सिंग ठाकूरच्या घरी पोहोचले, तेव्हा त्यांना जे आढळले त्याने सर्वांना धक्का बसला. घराच्या व्हरांड्यातील पाण्याच्या टाकीमध्ये एका महिलेचा मृतदेह पॉलिथिनच्या पिशवीत गुंडाळून टेपने एकत्र बांधलेल्या अवस्थेत पाच तुकड्यांमध्ये आढळला. हा मृतदेह आरोपीची पत्नी सती साहू हिचा असल्याचे निष्पन्न झाले.

पोलिसांच्या चौकशीदरम्यान, आरोपीने कबूल केले की त्याला आपल्या पत्नीच्या चारित्र्याबद्दल शंका होती. याच संशयामुळे त्याने खून केला. खुनानंतर त्याने बाजारातून एक पाण्याची टाकी आणि एक कटिंग मशीन विकत घेतले. त्यानंतर त्याने मृतदेहाचे हात, पाय आणि धड वेगवेगळे कापले, ते पॉलिथिनच्या पिशव्यांमध्ये भरले आणि टाकीत लपवून ठेवले. खुनानंतर, आरोपीने स्वतःचा बचाव करण्यासाठी एक रणनीती आखली. जवळपास दोन महिने, त्याने लोकांना सांगितले की त्याची पत्नी घर सोडून गेली आहे. इतकेच नाही तर, संशय येऊ नये म्हणून तो तिला शोधत असल्याचे नाटकही करत होता.

विशेष न्यायाधीश सिराजुद्दीन कुरेशी यांच्या न्यायालयाने म्हटले की, हा गुन्हा अत्यंत क्रूर आणि गंभीर होता. हत्येनंतर मृतदेहाचे तुकडे करून पुरावा नष्ट करण्याच्या प्रयत्नामुळे समाजात भीती आणि असुरक्षिततेची भावना निर्माण होते. न्यायालयाने आरोपीला कलम ३०२ अन्वये जन्मठेप, कलम २०१ अन्वये पाच वर्षांची सक्त कारावासाची शिक्षा आणि कलम ४८९-सी अन्वये पाच वर्षांच्या सक्त कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: धुळे जिल्ह्यामध्ये 9 पेट्रोल पंपांवर डिझेलचा तुटवडा

पुलासाठी ७ कोटी खर्च केला, ३ वर्षांत तडे गेले; प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण

नवी मुंबईत 'हिट अँड रन', बेलापूरजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत ३८ वर्षीय स्कूटर चालकाचा मृत्यू

Naneghat Tourism: निसर्गप्रेमींना भुरळ घालणारे नाणेघाट; पावसाआधीच धुक्याने वेढला घाट, ट्रिपसाठी लगेच करा प्लॅन

RCB playoff news: प्लेऑफपूर्वी RCB ला मोठा झटका; हा मॅनविनर खेळाडू पडला बाहेर

SCROLL FOR NEXT