नवी दिल्ली : जर तुम्ही बँकेच्या Bank कामानिमित्त या आठवड्यात बँकेत जाण्याचा विचार तर तुम्हाला तुमच्या शहरातील बँका बंद असलेल्या दिसून येतील. जर तुमच्याकडे बँकेशी संबंधित काही तातडीचे काम असेल तर आजच करून घ्या. कारण उद्यापासून अनेक शहरांमध्ये Cities बँका बंद राहतील.
हे देखील पहा-
दरम्यान, या आठवड्यात बँकांना गुरुवार पासून म्हणजेच 19 ऑगस्ट ते 23 ऑगस्ट यादरम्यान सलग 5 दिवसांची सुट्टी असणार आहे. मात्र माहितीनुसार बँकांच्या या सुट्ट्या एकाच वेळी सर्व राज्यांना States लागू असणार नाहीत हे लक्षात ठेवा. प्रत्येक राज्याला वेगवेगळ्या दिवशी सुट्टी घोषित करण्यात आली आहे. (Bank holiday in august)
भारतीय रिर्झव्ह बँकेने RBI दिलेल्या अधिसूचनेनुसार, सर्व बँका महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी आणि रविवारी बंद आहेत. खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील दोन्ही बँकांमध्ये हा नियम लागू आहे.
पुढील ५ दिवस कोणत्या शहरांत बँकेचे कामकाज बंद हे जाणून घ्या...
1) ऑगस्ट 19 - मोहरम (अशुरा) - मुंबई, नागपूर, बेलापूर, नवी दिल्ली, अगरतळा, अहमदाबाद, भोपाळ, हैदराबाद, जयपूर, जम्मू, कानपूर, कोलकाता, लखनौ, पाटणा, रायपूर, रांची आणि श्रीनगर येथे बँका बंद असतील.
2) 20 ऑगस्ट - मोहरम/फर्स्ट ओणम - चेन्नई, बंगळुरु, कोची आणि तिरुअनंतपुरममध्ये बँक बंद असतील.
3) 21 ऑगस्ट - थिरुवोणम - कोची आणि तिरुवनंतपुरममध्ये बँक बंद असणार आहेत.
4) 22 ऑगस्ट - रविवार मुळे सुट्टी असेल.
5) 23 ऑगस्ट - श्री नारायण गुरू जयंती - कोची आणि तिरुअनंतपुरममध्ये बँक बंद असतील.
Edited By-Sanika Gade
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.