sachin sawant slams to governor bhagat singh koshyari for offensive statement on savitribai phule Saam TV
मुंबई/पुणे

"१७ वर्षांच्या सावित्रीबाईंनी पहिली कन्या शाळा काढली" - सचिन सावंतांचं राज्यपालांना सणसणीत उत्तर...

Sachin Sawant On Bhagat Singh Koshyari: संघवाद्यांना हे कळणार नाही, असं ट्विट करत त्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर सडकून टिका केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुतळा अनावरण समारंभात सावित्रीबाई फुले यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्याचं राजकारण चांगलचं तापलयं. "सावित्रीबाई (Savitribai Phule) यांचे लग्न वयाच्या १० व्या वर्षी केले गेले. तेव्हा जोतिबा १३ वर्षाचे होते. ही दोन मुले लग्नानंतर काय विचार करत असतील" असं बोलताना राज्यपाल हसत आणि चुकीच्या पध्दतीने हातवारे करताना दिसत आहे. यावर आता कॉंग्रेस नेते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी राज्यपालांना सणसणीत उत्तर दिलं आहे. (Congress Leader sachin sawant slams to governor bhagat singh koshyari for offensive statement on savitribai phule)

हे देखील पहा -

सचिन सावंत म्हणाले की, महात्मा फुले व सावित्रीबाई लग्न झाल्यानंतर काय विचार करत असतील? असा प्रश्न उपस्थित केल्याचा राज्यपालांचा (Bhagat Singh Koshyari) व्हिडिओ व्हायरल होतोय. त्याला सणसणीत उत्तर देताना सचिन सावंत म्हणाले की, "ज्योतिबांना अभ्यास करताना पाहून सावित्रीबाईंनी मला शिकवा असे सांगितले. स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ देशात रोवली. केवळ ८ वर्षांच्या संवादातून १७ वर्षांच्या सावित्रीबाईंनी पहिली कन्या शाळा काढली.

त्यावेळी संघ ज्या मनुस्मृतीचा समर्थक आहे ते मनुवादी त्यांच्यावर चिखल उडवत होते. मनुवादाच्या जोखडाखाली हजारो वर्षे माजघराच्या चौकटीत व अज्ञानाच्या अंधःकारात पिचलेल्या स्त्रियांना आपल्या शक्तीची जाणीव करून देण्याचा सावित्रीबाई व ज्योतिबा विचार करत होते. संघवाद्यांना हे कळणार नाही, असं ट्विट करत त्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर सडकून टिका केली आहे.

दरम्यान राज्यपालांच्या या वक्तव्यानंतर महाविकास आघाडीतील नेत्यांनी राज्यपालांवर टिका करत त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: अचलपुरात बच्चू कडूंना मोठा धक्का; भाजपचे प्रवीण तायडे विजयी

Viral Video: बापरे! खोल विहिरीत महिलांनी घेतला झोका; VIDEO व्हायरल होताच नेटकरी झाले हैराण

Health Diet: तुमच्या रोजच्या आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश असणे महत्वाचे आहे? जाणून घ्या फायदे

Jharkhand Assembly Election Result: महाराष्ट्रात सेंच्युरी करणाऱ्या भाजपचा झारखंडमध्ये का झाला पराभव; काय आहेत कारण?

Nanded News : लोहामध्ये मतमोजणी केंद्राबाहेर दगडफेक; पोलिसांचा बंदोबस्त वाढविला

SCROLL FOR NEXT