supriya sule news  saam tv
मुंबई/पुणे

टाटा-एअरबसनंतर आणखी एक प्रकल्प राज्याबाहेर? सुप्रिया सुळेंनी घातली सर्व पक्षांना साद, म्हणाल्या...

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

साम टिव्ही ब्युरो

ज्ञानेश्वर हिंगोलीकर

Supriya Sule News : राज्यातून एकामागून एक प्रकल्प परराज्यात जात आहेत. या मुद्द्यावरुन आधीच राजकारणार तापलेलं असताना आता आणखी एक प्रोजेक्ट राज्याबाहेर गेला असल्याची माहिती समोर आली आहे. वेंदाता, बल्क ड्रग पार्क, टाटा एअरबस प्रोजेक्ट महाराष्ट्रातून बाहेर गेल्यानंतर विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला होता. अशात आता फ्रान्सचा सॅफ्रॉन ग्रुपचा प्रोजेक्ट नागपूर मिहानमधून हैदराबादला जात असल्याची माहिती मिळाली आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी पत्रकार परिषद घेऊन सॅफ्रॉन ग्रुपच्या प्रकल्पावरून शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. सुप्रिया सुळे म्हणाल्या, ' सॅफ्रॉन ग्रुपचा प्रकल्प राज्याबाहेर जाणे दुर्दैवी आहे. राज्याची सातत्याने सुरू आहे. प्रकल्प राज्याबाहेर गेले हे बाजूला ठेवून सर्व पक्षांनी एकत्र आलं पाहिजे. पंतप्रधानांची भेट घेतली पाहिजे'.

'ओला दुष्काळ आणि बाहेर गेलेले उद्योग यासाठी सर्वपक्षीय बैठक घ्या. पंतप्रधानांची बैठक घ्या. आज जे आरोप-प्रत्यारोप होताहेत ते महाराष्ट्रासाठी शोभणार नाहीत. नितीन गडकरी पारदर्शक काम करतात. ते सर्वसामावेश आहेत. सर्वांना सोबत घेऊन जातात. ते पक्ष बघत नाही, ते सर्वांचे काम करतात', असेही त्या म्हणाल्या.

किशोरी पेडणेकर यांच्यावर सुरू असलेल्या आरोपांवर देखील सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली. 'विरोधात बोलले की कारवाई होते, मला याबाबत आश्चर्य वाटत नाही, अशी प्रतिक्रिया किशोरी पेडणेकरांवर दिली. बच्चू कडू-रवी राणा यांच्या वादावर देखील सुळे यांनी भाष्य केलं. ' बच्चू कडू उगाच आरोप करत नाहीत. बच्चू कडू यांचे मनापासून स्वागत करते, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

'मंत्रीच म्हणतात, तुम्हाला खोके पाहिजे का ? पन्नास खोक्याची चर्चा वाड्या वस्त्यावर होत आहे. ईडी सरकार मेळव्यांमध्ये व्यग्र आहे. मंत्रालयात कुणीच नसते. राज्यासाठी सर्व एकत्र येऊया, राज्य अडचणीत आहे, असेही सुळे पुढे म्हणाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: महिला असुरक्षित,बेकारी वाढतेय- उद्धव ठाकरे

Mental Health: मानसिक आरोग्य संतुलित ठेवण्यासाठी 'या' गोष्टींचा करा आहारात समावेश

Health: शरीरासाठी आवश्यक पदार्थ कोणकोणते? जाणून घ्या एका क्लिकवर

Abhijeet Kelkar: 'धुरळा उडाला, सूर्य पुन्हा एकदा तळपला...' देवेंद्र फडणवीस यांच्या विजयानंतर मराठी अभिनेत्याची जबरदस्त पोस्ट, म्हणाला...

Amravati Assembly Election 2024: बच्चू कडूंना पराभवाचा धक्का, अमरावतीच्या प्रत्येक मतदारसंघाचा निकाल एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT