Central Railway Saam TV
मुंबई/पुणे

Central Railway: CSMT जवळ २ सिग्नल फेल! ऐन गर्दीच्या वेळी लोकल खोळंबल्या, हजारो प्रवासी ताटकळले; पाहा VIDEO

Signal Failures Near CSMT Station: मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळी झाली आहे. त्यामुळे सीएसएमटी रेल्वे स्थानकाजवळ अनेक लोकल एकापाठोपाठ उभ्या राहिल्या आहेत. ऐन गर्दीच्या वेळी लोकलसेवा विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहे.

Priya More

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. सीएसएमटी रेल्वे स्थानकाजवळ दोन सिग्नल यंत्रणेमध्ये बिघाड झाला आहे. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. सिग्नल यंत्रणेच्या दुरूस्ती काम सध्या सुरू आहे. सीएसएमटी रेल्वे स्थानकाजवळ अनेक लोकल एकापाठोपाठ उभ्या राहिल्या आहेत. ऐन गर्दीच्या वेळी लोकलसेवा विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेच्या सीएसएमटी रेल्वे स्थानकाजवळ दोन सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला आहे. दोन सिग्नल फेल झाल्यामुळे सीएसएमटी रेल्वे स्थानाकावर कोणत्याही लोकल येत-जात नव्हत्या. एका तासापासून हा तांत्रिक बिघाड झाला आहे. सीएसएमटी रेल्वे स्थानकाजवळ अनेक लोकल एकापाठोपाठ उभ्या आहेत. अजूनही सिग्नल यंत्रणेच्या दुरूस्थितीचे काम सुरू आहे.

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे ऑफिसवरून घराच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहे. सर्वच रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे. सीएसएमटी रेल्वे स्थानकावर सर्वच प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची गर्दी झाली असून ते लोकलची वाट पाहत आहेत. तर काही लोकल एकाच ठिकाणी उभ्या राहिल्यामुळे त्यामधील प्रवाशांना लोकलमध्येच ताटकळत बसावे लागत आहे.

दरम्यान, पश्चिम रेल्वेची वाहतूक आज सकाळी विस्कळीत झाली होती. चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या विरार जलद लोकल १५ ते २० मिनिटं उशिराने धावत होत्या. त्यामुळे सर्वच रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. कामाला निघालेल्या चाकरमान्यांचे यामुळे हाल झाले. ऑफिसला जाण्यासाठी उशिर झाल्यामुळे त्यांना लेटमार्क लागला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election Result : महाराष्ट्रातील पहिले १० निकाल, कोण कुठे विजयी झाले?

Eknath Shinde : महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदेंनी मोजक्या शब्दात सांगितलं

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: रोहित पवार पिछाडीवर, राम शिंदे आघाडीवर

Baramati Election Result: निकालाआधीच बारामतीत उधळला गुलाल! ,सुनेत्रा पवारांवर JCB ने फुलांचा वर्षाव - VIDEO

Dombivali Vidhan Sabha : डोंबिवलीत मतदान केंद्रात ठाकरे पदाधिकारी कार्यकर्त्यांचा गोंधळ

SCROLL FOR NEXT