Eknath Shinde Rashmi Thackeray Latest news  Saam TV
मुंबई/पुणे

नाराजी नाट्यात रश्मी ठाकरेंची एन्ट्री; एकनाथ शिंदेंसोबत फोनवरून संपर्कात

मंत्री एकनाथ शिंदे काही आमदारांसह नॉट रिचेबल आहे

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : राज्यात राजकीय घडामोडीला वेग आला असतानाच, आता एक मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेनेचे नाराज मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यासह रश्मी ठाकरे यांच्यासोबत फोनवरून संवाद साधला असल्याची माहिती आहे. गेल्या 10 तासांत अनेकवेळा एकनाथ शिंदे आणि रश्मी ठाकरे यांच्यासोबत फोनवरून संवाद झाला असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. 'शिवसेनेचा एकही आमदार फुटणार नाही आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत, आमच्यावर विश्वास ठेवा', असं शिंदे यांनी उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांना सांगितलं असल्याचं कळतंय. (Shivsena Eknath Shinde Latest News)

शिवसेनेचे नेते तथा महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री एकनाथ शिंदे हे नॉटरिचेबल झाले. एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या काही आमदारांना घेऊन गुजरातमधील सूरत येथील एका हॉटेलमध्ये थांबले असल्याची माहिती आहे. दरम्यान, ते भाजपमध्ये प्रवेश करणार, अशा चर्चांना उधान आलं असतानाच, आता उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांची फोनवरून एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा झाली असल्याची माहिती आहे.

गेल्या 10 तासांत अनेकवेळा एकनाथ शिंदे आणि रश्मी ठाकरे यांच्यात फोनवरून संवाद झाला असल्याचं कळतंय. 'शिवसेनेचा एकही आमदार फुटणार नाही आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत, आमच्यावर विश्वास ठेवा', असं एकनाथ शिंदेंनी रश्मी ठाकरेंना सांगितलं असल्याचं कळतंय. त्याचबरोबर, आमच्या भावना समजून घ्या अशी विनवणी सुद्धा एकनाथ शिंदेंनी रश्मी ठाकरे यांना केली असल्याची माहिती आहे.

शिवसेनेच्या नाराजीतलं तसंच महाविकास आघाडीतल्या घटक पक्षामधील मतभेद आणि त्यांच्या परिणामुळे शिंदे यांना हा पवित्रा घेतला असल्याची कबूली स्वत: शिंदे यांनी ठाकरे कुटुंबीयांकडे दिली असल्याची माहिती आहे.

एकनाथ शिंदेंना गटनेते पदावरुन हटवलं

दुसरीकडे, शिवसेनेने एकनाथ शिंदे यांना गटनेते पदावरुन हटवले आहे. शिवसेनेने आता अजय चौधरी यांना गटनेते पद दिले आहे. विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रातील राजकारण आज (मंगळवार) सकाळपासून ढवळून निघाले आहे. शिवसेनेचे खंदे समर्थक नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे सेनेच्या सुमारे 17 आमदारांसह सूरतला गेल्याचे समजते.

दरम्यान महाविकास आघाडी सरकार विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर सावरेपर्यंत शिंदेंनी दूसरा धक्का दिल्याची चर्चा आहे. शिंदे हे गुजरात भाजपचे अध्यक्ष सीआर पाटील यांच्याशी संपर्कात हाेते असेही समजते.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIDEO : कोल्हापुरात औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार जखमी, घटना कॅमेऱ्यात कैद

Jharkhand Results 2024 : झारखंडमध्ये इंडिया आघाडीची सरशी; हेमंत सोरेन आणि कल्पना यांची जोडी ठरली सुपरहिट

Maharashtra Election Result: देवेंद्र फडणवीसांनी चक्रव्यूह भेदलं! विधानसभा निवडणुकीत विरोधक चारही मुंड्या चीत

Maharashtra Election Result: बारामतीचा दादा 'अजितदादा'! लोकसभेला काका, विधानसभेला पुतण्या

Mahrashtra Election Result : हूश्श! अखेर रोहित पवार विजयी झाले

SCROLL FOR NEXT