भरत मोहोळकर-
NCP Sharad Pawar Group vs NCP Ajit Pawar Group: महाराष्ट्र विधानसभेत धक्कादायक निकाल लागले आहेत. त्यातच अजित पवारांच्या राष्ट्रवादीने काका शरद पवारांना धोबीपछाड दिलाय...राज्यातील 38 जागांवर दोन्ही राष्ट्रवादी आमने-सामने आले होते. यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीने जोरदार मुसंडी मारलीय... तर जनतेने खरी राष्ट्रवादी कोणती? याचं उत्तर दिल्याची प्रतिक्रीया अजित पवारांच्या राष्ट्रवादीने दिलीय.
राष्ट्रवादीच्या फुटीनंतर लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीने 80 टक्के स्ट्राईक रेटसह मुसंडी मारली. एवढंच नाही तर अजित पवारांचं होम पिच असलेल्या बारामतीतून सुप्रिया सुळेंना तब्बल 48 हजार मतांची आघाडी मिळाली होती. त्यातच शरद पवारांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या मतदारसंघात जाऊन गद्दारांना पाडण्याचं आवाहन केलं होतं.
शरद पवारांनी अजित पवारांच्या पक्षाच्या उमेदवारांच्या मतदारसंघात जाऊन गद्दारांन पाडा, असं आवाहन केलं होतं.
बारामतीचा दादा 'अजितदादा'
राष्ट्रवादी (SP) विरुद्ध राष्ट्रवादी (AP) -38
राष्ट्रवादी (AP) - 29 विरुद्ध राष्ट्रवादी (SP)- 07
लोकसभेतील पराभवातून अजित पवारांच्या राष्ट्रवादीने धडा घेत नव्या योजना आखल्या. त्यातच लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना साद घातली. त्याचाच अजितदादांच्या पक्षाला मोठा फायदा झाला. आता मिळवलेलं यश कायम ठेऊन अजित पवार कशी वाटचाल करणार? याकडे लक्ष लागलंय...
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.