रोहिदास गाडगे
आळंदी :-संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींचा आषाढी वारी (Ashadhi Wari) सोहळा दोन दिवसांवर आला असुन कोरोनाच्या (Covid19) पार्श्वभुमीवर अलंकापुरीत संचारबंदी (संचारबंदी) लागु असल्याने वारकरी आणि भाविकांना प्रवेश बंदी घालण्यात आलीय. मात्र आषाढीवारीचा उत्साह कणभरही कमी होऊ न देता संजीवन समाधी मंदिरात वारकरी गाथाभजनात टाळ मृदुंगाच्या नादात तल्लीन झाला आहे. (Immersed in Warkari Gathabhajan in Sanjeevan Samadhi Temple)
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या वर्षीही संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा आषाढी वारी सोहळा मर्यादित वारकरी यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. आषाढी वारी सोहळ्याला देशभरातून लाखोंच्या संख्येने वारकरी सहभागी होत असतात. मात्र वारी सोहळ्यादरम्यान कोरोनाचा समूह संसर्ग वाढू नये यासाठी प्रशासनाकडून यंदाचा ही आषाढी वारी सोहळा मर्यादित वारकऱ्यांच्या उपस्थित होणार असल्याचे आळंदी देवस्थानचे मुख्य विश्वस्त विकास ढगेपाटील यानी सांगितले आहे.
मात्र आषाढी वारी सोहळा मर्यादित वारकऱ्यांचा उपस्थित होत असला तरी वारीची परंपरा व धार्मिक विधी परंपरेनुसार माऊलींच्या संजीवन समाधी मंदिरात सुरू करण्यात आले आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी मंदिरात पहाटेची पवमान महाआरती झाल्यानंतर सकाळपासून मंदिरामध्ये गाथाभजन सुरू आहे. यामध्ये चिमुकल्या वारकऱ्यांचं तरुण वयोवृद्ध असे मर्यादित वारकरी उपस्थित राहून गाथाभजन करत आहे माऊलींचा आषाढीवारी सोहळा हा भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात साजरा व्हावा यासाठी या वारकऱ्यांचा हा प्रयत्न आहे.
Edited By- Anuradha Dhawade
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.