मुंबई: भाजपविरु्ध कोर्टात अनेक केसेस लढवणारे तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांविरोधात खटला लढवणारे वकील अॅड. सतीश उके (Adv. Satish Uke) आणि त्यांचे बंधू प्रदीप उके (Pradip Uke) यांच्या नागपूरच्या (Nagpur) घरात छापा (Raid) टाकत ईडीने (ED) त्यांना अटक (Arrest) केली होती. ईडी आज (१ एप्रिल) दोन्ही उके बंधूंना ईडी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. यासाठी वकिल रवी जाधव (Ravi Jadhav) हे अॅड. सतीश उके यांची न्यायालयात बाजू मांडणार आहे. यावेळी वकिल रवी जाधव यांनी "ईडी कायदेशीर प्रक्रिया पाळत नाही" असे गंभीर आरोप सक्तवसूली संचालनालयांच्या अधिकाऱ्यांवर अर्थात ईडीवर केले आहेत. ("ED does not follow legal process" - Allegations of Adv. Satish Uke's lawyer Ravi Jadhav)
हे देखील पहा -
सतीश उके यांना ईडीने काल नागपूरहून अटक केली. ईडी अधिकाऱ्यांनी आज उके यांना वरळीच्या सी. जे. हाऊस येथील कार्यालयात आणले. उके यांचा वकालतनामा घेण्यासाठी वकिल रवी जाधव हे गेले असता. ईडीने त्यांना उके याना भेटू दिले नाही. ईडी अधिकारी कायदेशीर प्रक्रिया पाळत नाही असा आरोप करत आपण ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून देऊ असं वकिल रवी जाधव म्हणाले आहेत.
कोण आहेत अॅड. सतीश उके?
सतिश उके हे नागपुरातील (Nagpur) प्रसिध्द वकील आहेत. नागपुरातील पार्वतीनगर भागातील निवास्थानी ईडीने पहाटे 5 च्या दरम्यान धाड टाकली. उके यांच्या घरी त्यांचे भाऊ आणि कुटुंबीय आहेत. एका जमीन व्यवहार प्रकरणी त्यांच्यावर धाड टाकल्याचे बोलले जात आहे. ईडीने (ED) तब्बत सहा तास त्यांच्या घराची झाडाझडती घेतली. यात त्यांनी सतिश उके यांचा लॅपटॉप जप्त केला आहे. ईडीने उके यांना अटक केली आहे.
उके यांनी सातत्याने भाजप (BJP) नेत्यांविरोधात खटले चालवित आहेत. नितीन गडकरी (Nitin Gadkari), देवेंद्र फडणवीस, किरीट सोमय्या, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विरोधात खटले चालवीत आहेत. तसेच नाना पटोले यांच्या फोन टॅपिंग प्रकरणात उके ते त्यांच्या बाजूने लढताहेत. त्यामुळे ही ईडी (ED) ने कारवाई केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र, उके यांच्यावर जमीन घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. त्या अनुषंगाने हा छापा टाकल्याचं बोललं जातं आहे.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.