MNS Saam TV
मुंबई/पुणे

मुंब्र्यात अनधिकृत भोंगे वाजल्यास राडा; मनसेचा सज्जड इशारा

मुंब्र्यात पहाटेच हनुमान चालीसाचे सूर घुमणार..!

विकास काटे, साम टीव्ही, ठाणे

मुंब्रा : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेल्या अल्टीमेंटमनंतर मुंब्र्यातील मशिदींवरील भोंगे पोलिसांनी उतरवले नाहीत आणि अनधिकृतपणे सकाळची बांग सुरू झाली, तर मनसेचे कार्यकर्ते मुंब्यात धडकणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने पालन न करता मुंब्र्यातील मस्जिदवरील भोंगा वाजला तर सकाळी ५ वाजण्याच्या शुभ मुहूर्तावर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा वाजवण्यात येईल.असा इशारा ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिला आहे.

हे देखील पाहा :

लाऊडस्पीकर हा विषय धार्मिक नसुन सामाजिक आहे. सामाजिक समस्या म्हणूनच त्याकडे पाहिले पाहिजे, बऱ्याच वर्षांपासून हा विषय सुटता सूटत नाही. त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेली भूमिका योग्य असून राज ठाकरेंनी दिलेल्या आदेशाचे पालन आम्ही नक्की करणार, असल्याचे जाधव यांनी यावेळी स्पष्ट केले.

मशिदीवरील भोंगे पोलिसांनी काढले नाहीत. तर आम्ही हनुमान चालीसा लावणार म्हणजे लावणारच असा आदेश राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिला असल्याने ठाणे जिल्ह्यात हनुमान चालीसा पठण करण्याचा निर्धार केला आहे.तसेच,भोंगा उतरवला नाही तर मुंब्रा येथील मशिदी बाहेर संघर्ष करणार. असे आव्हान अविनाश जाधव यांनी दिल्याने ठाण्यात भोंग्यांचा संघर्ष तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ईद सणामध्ये व्यत्यय नको म्हणुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ३ मे रोजी ऐवजी ४ मे पासुन भोंगे उतरलेच पाहिजेत. असा आग्रह धरला.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहुन शासनानेच ही कार्यवाही करणे गरजेचे आहे.तरीही नाहक या विषयाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला जातो हे दुर्दैवी असल्याचे मत अविनाश जाधव यांनी व्यक्त केले आहे.तेव्हा,भोंगे उतरले नाही तर, राज ठाकरेंच्या आदेशाचे पालन करण्यासाठी महाराष्ट्र सैनिक सज्ज असल्याचे जाधव यांनी म्हटले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: वडाळ्यातून सलग नवव्यांदा कालिदास कोलंबकर विजयी

Wayanad By Election Result 2024: भावाचा गड राखणार; प्रियंका गांधी २ लाख ३५ हजार मतांनी आघाडीवर

Abhishek Gaonkar : 'सारं काही तिच्यासाठी' फेम अभिनेता चढणार बोहल्यावर; नवरीचा थाटात पार पडला मेहंदी सोहळा, पाहा PHOTO

Maharashtra Election Result: भाजपला १२०+ जागा मिळणार! निकालाआधीच भाजपच्या नेत्याचा दावा

Amla Pickle: आवळ्याचे लोणचे आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे, जाणून घ्या कारणे...

SCROLL FOR NEXT