मुंबई : पेनड्राईव्ह प्रकरणात दिलीप वळसे पाटील यांनी दूध का दूध पाणी समोर येईलच, माझ्याकडे CD आहे वेळ नव्हती सांगितली मात्र ती लवकरच बाहेर आणेल असा इशारा भाजपचे माजी मंत्री आणि सध्या राष्ट्रवादीत असलेले एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी भाजपला दिला आहे.
ते म्हणाले, प्रफुल्ल लोढा हा गिरीश महाजनांचा (Girish Mahajan) कार्यकर्ता आहे. दाऊदशी संबंध जोडल्याने प्रसिद्धी मिळते, माझ्यावरही अनेक आरोप झाले होता. त्याचे काय झाले हे सगळ्यांना महित आहे. माझे आणि संजय राऊत (Sanjay Raut) यांचे फोन टॅपिंग केले गेले. याबाबत आज कुलाबा पोलीस स्टेशनमध्ये चौकशी झाली आहे. तसंच जे जे आपले स्पर्धक त्यांना वाटले त्यांचे फोन टॅपिंग केले गेले असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
दरम्यान, माझा फोन टॅपिंग झाले याबाबत मी गृह सचिवांना कळविले होते. नाथा भाऊंची त्यावेळी भीती वाटली असेल म्हणून फोन टॅपिंग झाले होते असही खडसे म्हणाले. राज्यपाल महोदयांना 12 आमदारांच्या (12 MLA) निवडीचा अधिकार आहे. न्यायालयाने निकाल दिला त्यांनी आता 12 आमदारांची नियुक्ती करावी. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पोलिसांनी काय प्रश्न विचारले याची माहिती फडणवीसच देऊ शकतील असही ते म्हणाले.
Edited By - Jagdish Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.