मुंबई: भारतीय जनता पार्टीच्या वतीने नगरसेवक अतुल शहा यांच्या मुंबादेवी वर्ल्डमध्ये जयवंतीबेन महेता चौक आणि लक्ष्मी नारायण मंदिर चौकाचे नामकरण झालं. भाजपाचे जेष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री राम नाईक भाजपा नेते राज पुरोहित यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. (BJP Senior Leader Ram Naik Reaction On Governors Statement About Shivaji Maharaj)
गिरगाव परिसरातील मुंबादेवी (Mumbadevi) वॉर्ड येथे या कार्यक्रमाचं भाजप (BJP) नगरसेवक अतुल शहा यांनी आयोजन केलं होतं. यावेळी माजी केंद्रीय मंत्री आणि माजी राज्यपाल यांनी माध्यमांना विविध विषयावर प्रतिक्रिया दिली. एखाद्या व्यक्तव्यावरुन असे वाद करणे योग्य नाही, अशी प्रतिक्रिया राम नाईकांनी राज्यपालांच्या वक्तव्यावर दिली.
"जयवंती बेन मेहता यांना बुलेश्वरची भवानी म्हटले जाते. इथे काँग्रेसचा दगड जरी उभा केला तरी निवडून यायचा. मात्र, इथे त्या निवडून आल्यात. त्या पालिकेत दोन वेळा निवडून आल्यात. त्यांचे भाषण आवडत असे. जयवंती बेन यांनी 1972 साली विधानसभेची निवडणूक लढवली. गिरगावमध्ये प्रमोद नवलकर त्यावेळी निवडून आले. मात्र, शिवसेनेने मलबार हिलमध्ये काम केले नाही जयवंती बेन हरल्या. मुंबईचे काँग्रेसच्या गुरुदास कामत यांचा त्यांनी पराभव केला. मुरली देवरा यांचा देखील त्यांनी प्रयत्न केला. मंत्री म्हणून देखील त्यांनी काम केले. भाजपच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षानंतर भाजपच्या उपाध्यक्षा म्हणून काम केलं", असं राम नाईक (Ram Naik) यावेळी म्हणाले.
राज्याचे सरकार बरोबर काम करत नाही - राम नाईक
"आरोप करणाऱ्यांनी आरोप करावे. मी त्यात शिरणार नाही. मी या वादात पडणार नाही राज्याचे सरकार बरोबर काम करत नाही", असं म्हणत त्यांनी राज्यातील ईडी (ED) कारवायांवर प्रतिक्रिया दिली आहे.
एखाद्या व्यक्तव्यावरून असे वाद करणे योग्य नाही - राम नाईक
राज्यपाल भगत सिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी उत्तरखंडमध्ये काम केले. त्यांनी मराठीत आधी भाषण केले. शिवाजी महाराज (Shivaji Maharaj) आणि रामदास स्वामी यांच्या एकजीवता होती, त्यामुळे एखाद्या व्यक्तव्यावरून असे वाद करणे योग्य नाही. राज्यपालांनी माफी मागावी की नाही याबद्दल मी बोलणार नाही. त्यावर राज्यपाल बोलतील, असंही राम नाईक म्हणाले.
Edited By - Nupur Uppal
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.